माजी सभापती कैलास बुवा काळे यांचा वाढदिवस उत्साहात तसेच घोडेगाव येथील शाळेत मुलांच्या प्रवेशोत्सवा निमित्त विविध उपक्रम साजरे –

घोडेगाव –

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव येथे इयत्ता पहिलीचा प्रवेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला प्रथम सर्व विद्यार्थ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाब पुष्प व बिस्कीट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांनी नवीन कपड्यात व फेटे बांधून आले होते तर नंतर इयत्ता पहिलीचा प्रवेश मेळाव्याचे उद्घाटन गावच्या सरपंच अश्विनी तिटकारे उपसरपंच सोमनाथ काळे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमंत काळे,दिनेश घुले,पालक महिला यांच्या हस्ते फीत कापून उद्‌घाटन करण्यात आले.शरद सहकारी बँकेचे संचालक सुदामशेठ काळे,घोडेगाव सोसायटीचे अध्यक्ष माऊली काळे,विनोद कासार,भीमाशंकर सहकारी कारखान्याचे माजी संचालक दशरथ काळे,कोलदरा गोणवडीचे माजी सरपंच कैलास दौंड,कैलासबुवा काळे मित्र मंडळाचे सर्व स्वयंसेवक,घोडेगाव ग्रामपंचायतचे सदस्य अमोलभाऊ काळे,स्वप्नील घोडेकर,कपिल सोमवंशी, नंदा काळे रूपाली जंबुकर,ज्योत्स्ना डगळे , सारिका घोडेकर,समता परिषद अध्यक्ष किरण घोडेकर,श्याम काळे मुख्याध्यापक पंचायत समितीचे अधिकारी राजेश मंदावार,किशोर वाघमारे,आपला आवाजचे ब्युरोचिफ मोसीन काठेवाडी,पुजा आर्विकर , पुनम सोमवंशी,मोनिका सुर्यवंशी,निलम सुर्यवंशी शेलार ताई,पालक गणेश सोमवंशी,किरण शिंगाडे पालक संघ अध्यक्ष सबा अन्सारी,मुख्याध्यापक अलका चासकर,उपशिक्षक सुनिता काठे,ललिता शेळके नंदा काठे,राजाराम काथेर इत्यादी उपस्थित होते.


प्रथम सरस्वती पुजन करून कार्यक्रमाची सुरवात झाली.तद्नंतर लोकनेते कैलास बुवा काळे सभापती यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्याना कैलासबुवा काळे मित्र मंडळाच्या वतीने ट्रॉफी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.नंतर सर्व विदयार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे व गणवेशाचे वाटप करण्यात आले.माऊली काळे,हेमंत काळे यांनी कैलासबुवाना शुभेच्छा दिल्या.कैलासबुवा काळे यांनी वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्याना खुप मोठे होण्याचा व चांगले शिक्षण घेण्याचा सल्ला दिला . समाजिक कार्यकर्ते राकेश मुथियान यांनी सर्व विदयार्थ्यांना चॉकलेट, ग्रामपंचायत घोडेगावच्या वतीने खाऊ व 72 विद्यार्थ्याना गणवेश,कैलास बुवा काळे मित्र मंडळाचे वतीने केळी व बिस्किट असे खाऊ वाटप करण्यात आले.राजाराम काथेर यांनी सुत्रसंचालन केले तर हेमंत काळे यांनी आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *