अजित पवार यांचे विश्वासू समर्थक पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड शहराच्या दै-यावर असताना घेतली आमदार बनसोडे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन सदिच्छा भेट…

माजी उपमुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते असलेले अजित पवार यांचे विश्वासू व खंदे समर्थक असलेले पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाला शुक्रवार दिनांक 16 जून रोजी पिंपरी-चिंचवड शहराच्या दौ-यावर असणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट दिल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे…
अजित पवार यांचा पहाटेचे शपत विधी असो कि बंडाचे कोणतेही धोरण असो यात सर्वात आधी अजित पवार यांच्या हाकेला साथ देणारे आमदार म्हणून पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे हे नेहमीच पुढाकार घेत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे…मात्र मागील एका वर्षांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता गेली आणि भाजप शिवसेना युतीचे शिंदे फडणवीस सरकार सत्ते मध्ये आले तेव्हापासून आमदार अण्णा बनसोडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याचा अनेक बातम्याही प्रसिद्ध झाल्या आणि अण्णा बनसोडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीत बसल्याचे फोटो ही व्हायरल झाले…

अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आलेले आमदार असून एकदा त्यांचा पराभव ही झालेला आहे…अण्णा बनसोडे हे नेहमी या ना त्या कारणाने राजकीय चर्चेत नेहमी राहतात मंग ते चिंचवड विधेनसभेचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सोबत त्यांचा असणारा फोटो हा त्यांनी डीपी ला ठेवने असो की शिवसेना भाजप नेत्यांच्या गाठीभेटी असो…चिंचवड विधानसभेचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची आणि आमदार अण्णा बनसोडे यांची मैत्रीही शहरात सर्वाना माहीत आहे…आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार अण्णा बनसोडे यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी उघड भूमिकाही घेतली होती.परंतु चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना मदत करून लक्ष्मण जगताप यांची मैत्री जपल्याचेही बोल्या गेले…अण्णा बनसोडे यांनी अश्विनी जगताप यांना उघड मदत केली नसली तरी पडद्यामागून बरिच सुत्रे हालवली अशी चर्चा आहे…पिंपरी-चिंचवड शहरात भोसरी,पिंपरी,चिंचवड असे एकूण तीन विधानसभा मतदारसंघ असून भोसरी विधानसभेतून महेश लांडगे हे भाजप चे आमदार आहेत तर चिंचवड विधानसभेतून अश्विनी जगताप ह्या भाजप च्या आमदार आहेत पिंपरी विधानसभेतून अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार असल्याने पिंपरी विधानसभेवर शिवसेना भाजप युतीचा डोळा आहे का?असा प्रश्न उपस्थित झाला आहे…
पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस कडून दोन वेळा आमदार राहिलेले आणि अजित पवार यांचे समर्थक अशी ओळख असलेले आमदार अण्णा बनसोडे हे शिवसेना भाजप युतीच्या संपर्कात का असतील असाही प्रश्न अनेकांना पडला असेल…2024 च्या विधानसभेच्या निवडणुकांचा विचार करता आणि काही करून पिंपरी विधानसभेची जागा ही शिवसेना भाजप युतीने जिंकायची अशी तयारी युती कडून सुरू असून भाजप कडून अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांचे नाव पुढे येत असून ही निवडणूक आपणांस जड जाऊ नये किवा या निवडणुकीत पराभव होऊ नये म्हणून तर आमदार अण्णा बनसोडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात नसतील ना ?

 

2024 चे युतीचे उमेदवार म्हणून अण्णा बनसोड हे निवडणूक लढविणार तर नाही ना ?असा प्रश्न ही समोर येत आहे…अण्णा बनसोडे हे जर 2024 ची निवडणुक युतीचे उमेदवार म्हणून लढले तर पिंपरी विधानसभेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस चा उमेदवार कोण असेल हे ही पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे…मागील काही दिवसात अजित पवार हे ही भाजप च्या वाटेवर असल्याचा चर्चाना उधाण आले होते…मात्र शरद पवार यांनी पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन खेळलेल्या राजकीय खेळीने अजित पवार यांची कोंडी झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे…त्यातच सुप्रिया सुळे यांना पक्षातून देण्यात आलेली मोठी जबाबदारी यामुळे ही अजित पवार हे नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या…2019 च्या निवडणुकी नंतर राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचा जन्म झाला यांचे सरकार आडीच वर्षाचा टप्पा पुर्ण करीत नाही तोच एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदार शिवसेना पक्षातून फोडून भाजप सोबत वेगळी चुल मांडत राजकीय भूकंप केला त्यामुळे राज्याच्या राजकारणात काय होईल हे सांगता येत नसले तरी पिंपरी चे आमदार अण्णा बनसोडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या भेटीने मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांचे टेन्शन मात्र वाढणार आहे हे नक्की आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *