श्री बजरंग फौजदार पोखरकर (अध्यक्ष ट्रस्ट )व पुणे महानगरपालिका मित्र मंडळ ऐकत्र येत पिंपळगाव येथील वयोवृद्ध दाम्पत्यास मदत…

पिंपळगाव घोडे : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी

कोरोना महामारी काळात अनेकांनी आपले रोजगार गमवले अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले, तसेच क्रीत्येकांवर उपासमारीची वेळ आली अशा सर्व गरिब गरजू निराधार , वयोवृद्ध दांपत्पास मदतीचा एक हात म्हणून श्री बजरंग फौजदार पोखरकर (अध्यक्ष ट्रस्ट )व पुणे महानगरपालिका मित्र मंडळ  ऐकत्र येत मोलाची मदत करुन एक सामाजिक बांधिलकी जपत पिंपळगाव घोडे , पोखरकरवाडी येथील  गरिब गरजूंना किराणा किटचे वाटप करण्यात आल्याची माहिती ट्रस्ट चे सचिव सचिन लाडके सर   यांनी दिली.


याप्रसंगी जेष्ठ नागरिक, विजू अण्णा लोहकरे ( तलाठी भाऊसाहेब, दत्ता पोखरकर,प्रदीप पोखरकर युवा नेते,सचिन गव्हाणे उपाध्यक्ष ट्रस्ट, श्री निलेश पोखरकर श्री.फकीरअण्णा गायकवाड,सचीन सर लाडके,लक्ष्मण वागदरे,अभीजीत ढमढेरे,संदीप पाचंगे,प्रवीण ढमढेरे,धोंडीभाऊ पटाडे,प्रसाद वागदरे, श्री.बजरंग पोखरकर आदि मान्यवर उपस्थित होते.तसेच कर्जुदेवी ग्रामदेवता मारुती मंदिर ट्रस्ट च्या सौजन्याने सदर कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *