महाराष्ट्र शासनाने विद्यार्थी आरोग्य तपासणी कार्यक्रम घेतला हाती : अन्नापुरच्या रयत शाळेत झाली आरोग्य तपासणी

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : दि. १३/०२/२०२३.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व राज्याचे आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांच्या पुढाकारातून, राज्यातील ० ते १८ वयोगटातील मुला मुलींचे सर्वांगीण आरोग्य तपासणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असुन, त्याचा कालावधी ४ फेब्रुवारी ते २० मार्च २०२३ पर्यंत असणार आहे.
त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, पुणे व पंचायत समिती शिरूर, यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर तालुक्यात या आरोग्य तपासणी कार्यक्रमाला सुरुवात झालीय. मौजे अन्नापुर येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत, करडे प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्नापुर उपकेंद्राच्या वतीने, हे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक बी पी पळसकर यांनी दिली.
यावेळी शाळेत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपला आवाज केबल टिव्ही चॅनेलचे विभागीय संपादक, तथा पत्रकार संरक्षण समितीचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा रवींद्र खुडे हे होते.
यावेळी मुख्य मार्गदर्शन करताना अन्नापुर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉ नरसिंग शिरसाठ यांनी सांगितले की, “महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या ० ते १८ वयोगटातील मुला मुलींच्या आरोग्य तपासणीत कान, नाक, घसा, त्वचा रोग, जन्मजात दोष, विकासात्मक विलंब संबंधित आजार, मानसिक आजार, लठ्ठपणा, वाढ खुंटणे आदी आजारांवर शासनाकडून उपाय योजना करण्याचा मानस आहे.”

कार्यक्रमावेळी ज्येष्ठ शिक्षक बी बी मेंगावडे सर यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन बी आर गुंड सर यांनी केले, तर आभार एम व्ही काझी सर यांनी मानले.
यावेळी आरोग्य सेविका अर्चना आराख, आरोग्यसेवक दयानंद माने, आशा वर्कर ज्योती कळमकर व त्यांच्या टीमने सुमारे ११७ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली.
पुणे जिल्ह्यातील ही आरोग्य तपासणी मोहीम, पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर करडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश कट्टीमणी व डॉ शेलार मॅडम यांच्या देखरेखीखाली, आरोग्यसहाय्यक रोहिदास नवले व त्यांच्या स्टॅफने या शिबिराचे कामकाज पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *