जी. प. सदस्या सुजाता अशोक पवार यांच्या प्रयत्नांतून, मांडवगण फराटा प्रा. आ. केंद्राला, जी. प. पुणे कडून मिळाली रुग्णवाहिका…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
मांडवगण : 07/07/2021

जिल्हा परिषद पुणे यांच्या सौजन्याने, १४ वा वित्त आयोग उर्वरित निधीतून, मांडवगण फराटा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती, सुजाता अशोक पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या रुग्णवाहिकेसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला होता.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी, मांडवगण व परिसरातील अनेक रुग्णांची खूप मोठ्या प्रमाणावर हेळसांड झाली होती.
मांडवगण फराटा व पंचक्रोशीचा खूप मोठा विस्तार असून, या भागाच्या मोठ्या लोकसंख्येच्या तुलनेत शासकीय रुग्णवाहिकेची निकड खूप वर्षांपासून होती. खाजगी दवाखान्यांमध्ये असणाऱ्या रुग्णवाहिकांचा दर, सर्वसामान्य लोकांना परवडणारा नसल्याने, येथे शासकीय रुग्णवाहिकेची अत्यंत प्राधान्याने गरज होती.
याबाबत आपला आवाज न्यूज नेटवर्कने दोन वर्षांपूर्वी बातमीही प्रसारित केली होती.

Advertise

मांडवगण फराटा ते शिरूर ग्रामीण रुग्णालय हे अंतर सुमारे 40 – 45 की. मी. आहे, तर मांडवगण ते करडे प्राथमिक आरोग्य केंद्र हे अंतर सुमारे 30 – 35 की. मी आहे. तर मांडवगण ते दौंड शहराचे अंतरही सुमारे 25 – 30 की. मी. असल्याने, मांडवगण व पंचक्रोशीतील लोकांना शासकीय रुग्णवाहिका ताबडतोब मिळणे कठीण होत होते.

या सर्व गोष्टींचा विचार करत, जी. प. सदस्या सुजाता पवार यांनी, जी. प. कडून एक अत्याधुनिक रुग्णवाहिका मिळवून दिल्याने सर्वांनीच त्यांचे आभार मानले आहेत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तर कौतुक केलेच, परंतु भाजपचे शिरूर तालुक्यातील एक ज्येष्ठ कार्यकर्ते शामआप्पा चकोर यांनीही पक्ष मतभेद विसरून सुजाता पवार यांच्या कार्याचे व पाठपुराव्याचे आपल्या मनोगतात तोंडभरून कौतुक केले. त्यांनी यावेळी उपस्थितांना आठवण करून दिली की, सुजाता पवार यांच्या कार्याची दखल अजितदादा पवार यांनी वेळोवेळी घेतली असून, अजितदादांनी एका कार्यक्रमात जाहीरपणे सांगितले होते की, “अशोक पवार यांना त्यांच्या कार्यात खरी साथ देणारी अर्धांगिनी त्यांना मिळालीय, त्यामुळे अशोक पवार यांचे खूप मोठे भाग्य आहे की त्यांना अशी पत्नी मिळालीय”
यावेळी अनेक उपस्थितांनी रुग्णवाहिका मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून मनोगतात तशा आपल्या भावनाही व्यक्त केल्या.

  रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमावेळी, पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, गटविकास अधिकारी विजयसिंह नलवडे, रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय फराटे, कृषी संवर्धन समिती सदस्य शामआप्पा चकोर, पोलिस पाटील बाबा पाटील फराटे इनामदार, संजय गांधी निराधार योजना सदस्या प्रतिभा बोत्रे, मांडवगण फराटाचे सरपंच शिवाजी कदम, पिंपळसुटी सरपंच श्रूषी फराटे, शिरसगावकाटाचे सरपंच संतोष जाधव, इनामगावच्या सरपंच घाडगेताई, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते - इसवे, मांडवगण फराटा गावच्या माजी सरपंच लतिका जगताप, धनंजय फराटे ईनामदार, कैलास फराटे, राजेंद्र पोळ, शिरूर खरेदी विक्री संघाचे माजी संचालक शरद चकोर, मांडवगण फराटा ग्रामपंचायतचे सदस्य सागर फराटे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप फराटे, ग्रामपंचायत सदस्य यशवंत गायकवाड, राजेंद्र जगताप आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *