नारायणगाव : नवागतांचे शाळेत जोरदार स्वागत, नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात

 ही आवडते मज मनापासुनी शाळा लाविते लळा हि जशी माऊली बाळा.

आज पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचा चिवचिवाट सर्वत्र ऐकायला आला आणि शिक्षकांसह सर्वांना मनस्वी आनंद झाला.
“आनंदाने भरला मेळा, चला चला सुरु झाली शाळा” असे म्हणत आपल्या आईचा हात धरून मुले शाळेत दाखल झाली.
बस्ती (ता.जुन्नर) येथे ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य त्याचप्रमाणे आदर्श गाव श्रीक्षेत्र बस्ती प्रथम नागरिक प्रकाश गिदे, प्रमोद गोरडे,रोहिदास गोरडे, मनोज बोऱ्हाडे , अमोल शेलार , गुलाब गोरडे , गोरक्ष जाधव शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत गिदे, एकात्मिक बालविकास पंचायत समिती जुन्नरच्या पर्यवेक्षिका जयश्री पुंडे , संजीवनी शेलार, वंदना जाधव ग्रामसेविका नूतन चिंचपुरे मॅडम आदी मान्यवर मेळाव्यासाठी उपस्थित होते.
प्रथम विद्यार्थ्यांचे प्रभातफेरी काढून औक्षण करून गुलाब पुष्प देण्यात आले. भेट म्हणून पेन्सिल पाऊच वह्याचे वाटप करण्यात आले . शाळेतील एक वेगळा उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल पायांचे ठसे घेण्यात आले. विद्यार्थ्यांना पौष्टिक खाऊचे वाटप करण्यात आले.
शाळा पूर्वतयारी मेळावा
एप्रिल महिन्यामध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक एक त्या पार्श्वभूमीवर पूर्ण महिन्यामध्ये विद्यार्थ्यांनी काय तयारी केली. यासाठी मेळाव्याचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल आणि पालकांनी घेतलेली कृती याविषयी अंगणवाडी सेविका आणि शिक्षिका यांनी केलेल मार्गदर्शन विद्यार्थ्यांमध्ये योग्य तो बदल दिसून आला. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला. आनंददायी वातावरणामध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न झाला.
आज वृक्षारोपण देखील आयोजन करण्यात आले. याच बरोबर पर्यावरणाचा संदेश देण्यात आला “झाडे लावा झाडे जगवा.” “पर्यावरणाचे रक्षण, वसुंधरेचे रक्षण”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंत्रस्नेही शिक्षिका संगिता ढमाले मॅडम यांनी केले. गावचे प्रथम नागरिक  प्रकाश गिदे यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेला सर्व परीने सहकार्य करण्याचे संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आश्वासन देण्यात आले.
कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा हांडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *