“मोदी @९ ” अभियानाचा भाजपा कडून देशभरात प्रसार आणि प्रचार

प्रसन्न तरडे
पिंपरी-चिंचवड
दि.7/06/2023


पत्रकार परिषद घेऊन ‘मोदी @९ ‘ उपक्रमाची दिली माहीती

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला यंदाच्या वर्षी ९ वर्षपूर्ण होत आहे.आणि त्यानिमित्ताने देशभरात भाजपा तर्फे “मोदी @९ ” या महासंपर्क अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.या महासंपर्क अभ्याण्याच्या माध्यमातून मागील नऊ वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून समाजात कशाप्रकारे विकास कामे झाली या संदर्भात गावोगावी तसेच शहरात झालेल्या कामांचा प्रसार व प्रचार करण्यात येणार आहे.ज्यात विशेष करून केंद्र सरकार ने राबवलेल्या विविध सरकारी योजना तसेच कोविड काळातील कामांचा प्रचार करण्यात येणार आहे. या निमित्ताने बुधवार दिनांक 7 मे 2023 रोजी माजी मंत्री बाळ भेगडे यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

पत्रकार परिषदेत मोदी @९ या महासंपर्क अभियानाची अधिक माहिती देण्यात आली.या पत्रकार परिषदेस भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे,चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अश्विनी जगताप,चिंचवड विधानसभा मतदारसंघ प्रभारी शंकर जगताप,विधान परिषद आमदार उमा खापरे,मोरेश्वर शेडगे,एकनाथ पवार,राजू दुर्गे तसेच इतर भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *