नारायणगाव येथे महारक्तदान शिबिरात १११६ जणांनी केले रक्तदान

नारायणगाव (किरण वाजगे)
नारायणगाव चे सरपंच योगेश पाटे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत नारायणगाव, समस्त ग्रामस्थ व राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या वतीने नारायणगाव येथील मुक्ताई समाज मंदिर मंगल कार्यालयामध्ये आज दिवसभर महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १११६ जणांनी विक्रमी रक्तदान केले.
या शिबिरमध्ये माजी आमदार शरद सोनवणे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, संचालक संतोष नाना खैरे, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे, रशीद इनामदार, सुजित खैरे, विकास तोडकरी, भागेश्वर डेरे, राष्ट्रवादीचे शहरप्रमुख रोहिदास केदारी, सुदीप कसाबे, जयेश कोकणे, संतोष दांगट, रोहिदास भुजबळ, संतोष कोल्हे, जितू आंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.


पुणे येथील पुना ब्लड बँकेच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले. हे शिबिर सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चालू होते. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे आपला आवाज चे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी ३७ व्या वेळी रक्तदान केल्याबद्दल माजी आमदार शरद सोनवणे यांनी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिबीरामध्ये रक्तदान करणार्‍या प्रत्येक रक्तदात्यांना एक ट्रॅक सूट, मास्क व प्रमाणपत्र देण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी नारायणगाव ग्रामपंचायत चे सदस्य, कर्मचारी तसेच राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मोठे परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *