शब्द जपून वापरा, उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या अमित शाहांना संजय राऊतांचा इशारा

१५ डिसेंबर २०२२


शिवसेना ठाकरे गटातील नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सीमावादाच्या मुद्द्यावरून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. .

संजय राऊत म्हणाले, आम्हाला जर राजकारण करायचं असतं, तर या प्रश्नावर १९६९ सालामध्ये आम्ही ७० हुतात्मे दिले नसते आणि बाळासाहेबांनी या प्रश्नाचे तुरुंगात भोगला नसता. छगन भुजबळ किंवा अनेक आमचे लोक त्या काळामध्ये बेळगावमध्ये गेले. शरद पवार, एस एम जोशी, नानासाहेब गोरे, श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे यांची नावे त्यांना माहित आहेत का? ज्यांनी त्या भागात जाऊन मराठीसाठी मराठी माणसासाठी सत्याग्रह केलेला आहे,त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा फार जपून शब्द वापरले पाहिजे. उद्धव ठाकरे राजकारण कशाला करतील आणि तो प्रश्न सत्तर वर्ष भिजत पडलेला आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

जर राम मंदिरासारखा प्रश्न सुटू शकतो तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न का सुटू नये? आजही बेळगाव सीमा भागामध्ये २४ लाख मराठी बांधव आहे. त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला आमच्या भाषिक राज्यात जाऊ द्या. हे भाषिक राज्य घटनेनुसार निर्माण झालेलं आहे. मग बेळगावच्या मराठी लोकांना हा साधा प्रश्न आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेवर आरोप करण्यापेक्षा तुम्ही आमच्या लोकांना न्याय दिला तर बरं होईल, असा टोला संजय राऊत यांनी शाह यांना लगावला.