सांगली जिल्ह्यात महापुराचे थैमान- कोरोनाचा संकटाबरोबर महापूर पलूस तालुक्यातील भिलवडी गावात पाणी…

सांगली जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू आहे.जिल्हयात पूर्ण कडकडीत लॉकडाऊन आहे.
आता महापुराने थैमान घातले आहे .
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णा नदीला महापूर आला असून सखल भागात पाणी शिरू लागले आहे. त्यामुळे पलूस तालुक्यातील भिलवडी येथील नागरिकांना तहसीलदार निवास ढाणे यांच्या उपस्थितीत मौलानानगर येथील नागरिकांना प्रशासनाकडून स्थलांतरित करण्यात आले आहे. तर भिलवडी पूल रात्री अडीचच्या दरम्यान पाण्याखाली गेल्याने भिलवडी -अंकलखोप संपर्क तुटला आहे.
तर पहाटेपासून भिलवडी मार्केटमध्ये पुराचे पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे. तर सूर्यगाव- काळंबादेवी मंदिरासमोर पाणी आले आहे.
सांगली जिल्ह्यावर मोठे संकट आलेमुळे नागरिक भयभीत झाले आहेत—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *