आंबेगाव : कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू |

एकलहरे ता.आंबेगाव गावचे हद्दीत घोडनदी वर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची दुःखद घटना घडली असून एकलहरे ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे.
गुरुवार दिनांक १ रोजी दुपारी १२:३० चे दरम्यान घटना घडली आहे. आरती शाम खंडागळे वय १८, प्रीती श्याम खंडागळे वय १७ (दोघी रा. मुंबई बांद्रा) असे या सख्ख्या बहिणींची नावे आहेत. आरती खंडागळे व प्रीती खंडागळे या त्यांच्या मावशीच्या मुलीच्या मुलाच्या वाढदिवसासाठी १० दिवसापूर्वी मुंबई बांद्रा येथून एकलहरे येथे आल्या होत्या. काल त्यांच्या घरी मावस भावाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला.आज दुपारी  बारा वाजता आरती, प्रिती, त्यांची मावशी कुषा नारायण घोरपडे, मुलीची मावस बहीण वर्षा नारायण घोरपडे व कावेरी बाळासाहेब आलझेंडे वय १२ या पाच जणी नदीवर कपडे धुण्यासाठी आल्या होत्या त्यावेळी कपडे धुवत असताना कावेरीचा पाय घसरून ती पाण्यात पडली तिला वाचवण्यासाठी प्रीती खंडागळे व आरती खंडागळे यांनी नदीत उडी मारली पाण्याची पाण्याचा अंदाज न आल्याने पाणी खोल असल्याने प्रीती व आरती सरळ नदीत बुडाले तर त्यांना वाचविण्यासाठी काठावर उभे असलेल्या महिलांनी आवाज दिला. त्या वेळी पोलीस पाटील निखिल गाडे, अक्षय धोत्रे, राम फलके, संतोष डोके, राहुल डोके, दीपक डोके यांनी पाण्यात उडी मारून मुलींना पाण्याच्या बाहेर काढले. कावेरी ही बाजूला दगडात अडकले असल्याने ती वाचली मात्र आरती व प्रीती या यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती कळतात मंचर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली मयत आरती व प्रीती यांना रुग्णवाहिका चालक गौरव बारणे यांनी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले आहे.
आईने रोखल्‍याने तिसरी वाचली

घोड नदीत कपडे धुवायला गेले असताना देान्‍ही बहिणी बुडून मृत झाल्‍या. त्यांच्या मदतीसाठी तिसरी बहिण देखील घोड नदीत उतरत होती. परंतु, आईने प्रसंगावधान राखल्याने तिला बाहेर आणले. यामुळे सुदैवाने तिचा जीव वाचला. कावेरी बाबासाहेब अलझेंडे (वय १२) आणि वर्षा नारायण घोरपडे (वय १७) या दोन मुली सदर घटनेत बचावल्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *