जुन्या वादाच्या वैमनस्यातुन बंदुकीचा धाक दाखवुन जीवे मारण्याची धमकी देणा-यास अटक

दिनांक ०१/०६/२०२३ रोजी पाहिजे आरोपी नामे अशोक वाडेकर यांने जुन्या भांडणाचे कारणा वरुन भावकीतील इसमास बदुकीचा धाक दाखवुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. | त्यावरुन चाकण पोलीस ठाणे, गुरजि. नं. ४९८/२०२३ भादवि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ सह | शस्त्र अधिनियम कलम ३ (२५) सह मपोका कलम ३७ (१) (३), १३५ असा गुन्हा दाखल आहे. मा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सो, मा.पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे यांनी वपोनि शैलेश गायकवाड यांना तात्काळ आरोपीचा शोधुन ताब्यात घेण्याबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे सदर आरोपीचा शोध घेत असताना माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी नामे अशोक वाडेकर हा हबमाळ डोंगर परिसर, बहुळ, खेड, पुणे परीसरात लपुन बसला आहे. गुन्हे शाखा युनिट १ कडील स्टाफ असे बातमीचे ठिकाणी हबमाळ डोंगर परिसर, बहुळ, खेड, पुणे येथे जावुन आरोपीचा कसोशीने शोध घेतला असता तो गणेश मंदिराचे मागे, हबमाळ डोंगर परिसर, बहुळ, खेड, पुणे येथे मिळुन त्यास नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अशोक गोविंद वाडेकर, वय ४७ वर्षे, रा. हबमाळ वस्ती, बहुळ, खेड, पुणे असे सांगीतले. त्यास ताब्यात घेवुन गुन्हयाच्या अनुशंगाने त्याची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गुन्हयात | वापरलेले एक गावठी कट्टा तसेच इतर एक छ-याची बंदुक अशी किंमत रुपये २४,५००/- ची हत्यार ताब्यात घेण्यात आली आहेत.

नमुद पाहिजे आरोपी अशोक गोविंद वाडेकर, वय ४७ वर्षे, रा. हबमाळ वस्ती, बहुळ, खेड, पुणे यांस त्याचेकडे मिळुन आलेल्या हत्यारासह चाकण पोलीस ठाणे, गु. रजि. नं. ४९८ / २०२३ भादवि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ सह शस्त्र अधिनियम कलम ३ (२५) सह मपोका कलम ३७ (१) (३), १३५ या गुन्ह्याचे कामी चाकण पोलीस स्टेशनला हजर केले आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, | अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख पोलीस अमंलदार शिवाजी कानडे, बाळासाहेब कोकाटे, महादेव जावळे, सोमनाथ बो-हाडे, फारुक मुल्ला, अमित खानविलकर, प्रमोद हिरळकार, अजित रूपनवर, विशाल भोईर, मारोती जायभाये, तानाजी पानसरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *