‘तारीख पे तारीख’ शिंदे सरकारवर हातोडा पडणार ?

दि.०९/०१/२०२३
मुंबई


मुंबई :राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस यांचं सरकार राहणार की जाणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचं लक्ष लागलं आहे.

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. घटनाबाह्य सरकार सत्तेवर एक दिवसही राहता कामा नये, असा आदेशच कोर्टाने द्यायला हवा होता अशी आमची अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. तारखावर तारखा पडत असल्या तरी एक दिवस शिंदे सरकारवर नक्कीच हातोडा पडेल, असं सांगतानाच उद्याच्या निर्णायकडे आम्हीही अपेक्षेने पाहत आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या सुनावणी आहे. आमचा कोर्टावर विश्वास आहे. ज्यांनी पक्षांतर केलं. घटनाबाह्य सरकार स्थापन केलं. त्यांचा विश्वास दिल्लीतील महाशक्तीवर आहे. त्यामुळे महाशक्ती विरुद्ध घटना असा सामना आहे. आम्ही न्यायालयाला मानतो त्यामुळे आमची मागणी योग्य आहे, असं राऊत यांनी सांगितलं.दुर्देवाने आजचं मरण उद्यावर ढललंल जात आहे. बेकायदेशीर सरकार, घटनाबाह्य सरकार एक दिवसही सत्तेवर राहता कामा नये हा निर्णय कोर्टाकडून अपेक्षित होता. आजही आहे. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडले जातात. त्यामुळे आम्ही अपेक्षेने पाहतो आहे, असंही ते म्हणाले. त्यामुळे उद्या सत्ता संघर्षावरील सुनावणीत काय निर्णय होणार की फक्त तारीख पे तारीख पुढे ढकलली जाणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *