दिवंगत महापौर भिकु वाघेरे-पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी, दि.1 मे
दिवंगत महापौर भिकु वाघेरे-पाटील यांच्या 37 व्या स्मृतीदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार, रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर, जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा असे विविध कार्यक्रम मंगळवार दि.6 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आले आहेत. कार्यक्रम पिंपरी वाघेरे येथील नवमहाराष्ट्र विद्यालय मैदान येथे होणार आहेत, अशी माहिती दिवंगत भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष तथा माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब वाघेरे, किसन वाघेरे, रमेश कुदळे, शेखर कुदळे, रामदास कुदळे, अण्णा कापसे, जयवंतराव शिंदे, अनवर शेख, विजू थॉमस, गणेश गोंडे, योगेश पंडाळकर आदी उपसथित होते.

माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील यांनी सांगितले की, दिवंगत महापौर कै. भिकु वाघेरे-पाटील प्रतिष्ठानाच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी नऊ वाजता पिंपरी वाघेरे येथील दिवंगत महापौर कै. भिकु वाघेरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *