टाकवे खुर्द येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात चोरी

दि. ०५/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी : मुंबई पुणे महामार्गाजवळ असलेल्या टाकवे खुर्द येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास चोरी झाली आहे.

या मध्ये मंदिरातील डिजिटल डिस्प्ले, दोन मोठ्या पितळी घंटा, दहा लहान घंटा, मंदिरात असणारा पितळी कलश व शेजारील मंदिरात पिंडीवर असणारा कलश चोरीस गेल्या असल्याची माहिती मंदिरातील पुजारी विश्वनाथ गायकवाड, सरपंच तुशांत ढमाले, पोलीस पाटील प्रतिक पिंगळे यांनी दिली.याप्रकरणी चोरी प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *