लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जन्मभुमी करमसद जि.आणंद येथील पवित्र माती मंगल कलश
भारताचे माजी गृहमंत्री लोहपुरुष हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे महानायक सरदार वल्लभभाई पटेल जन्मभुमि करमसद जि. आनंद गुजरात राज्य पवित्र माती मंगल कलश संकलन सोहळा मराठवाडा मुक्तीसंग्राम भारतीय स्वातंत्र्याच्या पुर्णत्वाचा अमृत महोत्सव वर्षा निमित्त मराठवाडा जनविकास संघ ,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीन करण्यात आला . सरदार वल्लभभाई पटेल यांचा हैदराबाद मुक्तीसंग्राम लढयात खुप जवळचा संबंध होता. मराठवाडा मुक्तीसंग्राम लढयाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ हे प्रत्येक गोष्ट सरदार वल्लभभाई पटेल यांना वेळोवेळी सांगत असत. स्वामी रामानंद तीर्थ जन्मभुमी सिंदगी कर्नाटक ते मराठवाडा ते हैदराबाद तेलंगणा पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रा संकल्पक नितीन चिलवंत व मार्गदर्शक अरुणभाऊ पवार यांच्या नेतृत्वात यशस्वी काढण्यात आली .

हैदराबाद मुक्तीसंग्रामातील १६ जिल्हयातील स्वातंत्र्यसैनिक व हुतात्मा यांच्या घरच्या पवित्र माती मंगल कलशात संवाद यात्रे मध्ये संकलीत करण्यात आले पण ज्यांच्या कठोर निर्णयामुळे भारत सरकारच्या लष्कराच्या माध्यमातुन पोलीस अॅक्शन जुलमी हैदराबादच्या निजामा विरुध्द १३ सप्टेंबर १९४८ रोजी घेण्यात आली अन् १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाच्या तावडीतुन संपुर्ण प्रांत मुक्त केला ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जन्मभुमी करमसद जि. आणंद येथील पवित्र माती मंगल कलश संकलीत करण्याच अनमोल कार्य मराठवाडा सखी मंचच्या अध्यक्षा रेश्मा नितीन चिलवंत व चिरंजीव युवराज चिलवंत ,चिरंजीव शौर्य चिलवंत यांनी केले त्यांनी मराठवाडा जनविकास संघ ,महाराष्ट्र राज्य यांची वतीन करमसद येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मभुमिस मानवंदना दिली त्याच बरोबर त्यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संग्रहालयास भेट दिली. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव वर्ष साजर करत असतांनी मराठवाडा जनविकास संघ ,महाराष्ट्र राज्य भारत देशाचे पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांना १७ पवित्र माती मंगल कलश देशाची राजधानी नवी दिल्ली येथे भेट देऊन देशभक्तीच स्फुल्लींग … मनामनात पेटविण्यासाठी जुन्या संसद भवनात भारतीय स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच, हुतात्मा झालेल्या सैनिकांच त्याच बरोबर भारत देश स्वतंत्र झाला १५ ऑगस्ट १९४७ ते २०२२ या वर्षा पर्यंत भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर शहीद सैनिकांच्या माहीतीच संग्रहालय व्हाव आणि त्याच बरोबर जुन्या संसद भवनात हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्याचा ज्वाजल्य इतिहास सुंदर पध्दतीन मांडण्यात यावा ही भुमिका घेऊन लवकरच कार्य करणार आहोत. सर्व मराठवाडयाच्या भुमिपुत्रांनी सौ. रेश्मा नितीन चिलवंत व त्यांच्या दोन्ही मुलांच्या देशभक्तीच्या कार्याच कौतुक केले. श्री. क्षेत्र आळंदी श्री. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भुमित मराठवाडा जनविकास संघान संकलीत केलेल्या पवित्र माती मंगल भव्य दिव्य पुजन सोहळयाचे आयोजन करणार आहोत असे अध्यक्ष अरुण पवार यांनी सांगितले आणि सदैव माता आणि मातीसाठी आम्ही सर्व मराठवाडा भुमिपुत्र काम करणार आहोत सांगितले आणि सर्व चिलवंत परिवारानं पवित्र माती संकलनाच कार्य केले आहे ते मराठवाडा भुमिपुत्रांचे उल्लेखनीय कार्य आहे. आम्हांला अभिमान वाटतो असे कुटुंबाचा !