कागद, टोनर यांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे झेरॉक्स व्यवसाय डबघाईस आला

०१ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


झेरॉक्ससाठी लागणारा कागद , टोनर यांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे झेरॉक्स व्यवसाय डबघाईस आला आहे . गेल्या तीन वर्षांत कागद , वीजबिल , मेंटेनन्स आणि इतर खर्च वाढल्याने जम्बो झेरॉक्स व्यावसायिक अडचणीत आले आहेत . परिणामी , खर्च झेपत नसल्याने अखेर झेरॉक्सच्या दरात मोठी वाढ झाली आहे शहरात लहान ८ हजार किरकोळ झेरॉक्स व्यावसायिक आहेत तर १६० जम्बो झेरॉक्स दुकाने आहेत . न्यायालय , पुरवठा कार्यालये , अप्पर तहसील , भूमापन , महापालिका , बँका असे मोठे जाळे असल्याने झेरॉक्सला मागणी आहे.

इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे . झेरॉक्स व्यवसायासाठी लागणारा पेपर , टोनर ( शाई ) यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे . व्यवसायातील प्रचंड स्पर्धेमुळे ग्राहकांना झेरॉक्स अल्पशा दरात दिली जाते . त्यामुळे झेरॉक्स व्यावसायिकांना तोटा सहन करावा लागतो. गेल्या वीस वर्षांपासून झेरॉक्सचे दर कायम आहेत. पूर्वी जास्त प्रती काढल्यास ५० पैसे कॉपी , तर प्रतिकॉपी पाठपोट १ रुपया असा दर होता . एका दुकानात प्रत्येक दिवशी एक हजार झेरॉक्स कॉपी काढण्यात येतात.

विद्यार्थ्यांना दरवाढीचा फटका महाविद्यालयात आता पूर्वीप्रमाणे नोट्स लिहून दिल्या जात नाहीत . तर नोट्स एखाद्या झेरॉक्स सेंटरवर उपलब्ध करून दिल्या जातात . १०० ते २०० पेजेसच्या झेरॉक्स एका विद्यार्थ्याला काढाव्या लागतात . मात्र झेरॉक्सच्या वाढत्या दरामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे . पूर्वी एक रुपयात मिळणारे झेरॉक्स आता तीन ते चार रुपयांपर्यंत पोहोचले आहे . नवीन पुस्तकाचे दर विद्यार्थ्यांना परवडत नाहीत . विद्यार्थी त्यातील नोट्स झेरॉक्स करतात . मात्र , ही दरवाढ विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत आहे.

कागदाच्या दरात वाढ कागदाच्या रिमची किंमत १४८ ते १५० रुपये आहे . एका रिममध्ये ५०० कागद असून , एक कागद ५६ पैशास पडतो . लाइट , टोनर आणि इतर खर्चाचा विचार करता एका प्रतीसाठी ५२ ते ५५ पैसे खर्च येतो . ५० पैशात प्रत कशी द्यायची , असा सवाल झेरॉक्स किरकोळ व्यावसायिकांनी केला आहे . डिझेलवरील जनरेटरचा वापर करून ५० पैसे किंवा एक रुपयात प्रिंट देणे परवडत नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *