पिंपरी चिंचवड मधील धक्कादायक प्रकरण ‘वायसीएम’ च्या कचराकुंडीत नवजात अर्भक सापडलं !

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील कचरा कुंडीत  सकाळी एक नवजात अर्भक सापडलं. या घटनेमुळे वायसिएम रुग्णालय परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. अवघ्या काही दिवसाचे असलेले हे अर्भक काचऱ्याच्या कुंडीत सापडले आहे. मात्र, हे अर्भक कुणी टाकलं, याबाबत सीसीटीव्ही द्वारे संबंधिताचा शोध घेतला जात आहे. तसेच हि बातमी संपूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये वेगाने पसरली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय.

नवजात अर्भकाला बघण्यासाठी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली  आहे. घटनास्थळी पोलिस देखील आले आहेत तसेच ह्या संपूर्ण प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे हे बाळ कोणाचं आहे याचा देखील शोध सुरु आहे.
दरम्यान, “हे नवजात अर्भक वायसीएम रुग्णालयातील नाही  त्यामुळे सदरील नवजात अर्भक कुणी टाकलं, त्याचा शोध आम्ही घेत असून सीसीटीव्ही तपासले जात आहे”असे वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. राजेंद्र वाबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *