राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अंतर्गत वाद? शिरूर लोकसभेसाठी नवा उमेदवार?
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण माविआ मध्ये सर्व काही आलबेल दिसत नाही ठाकरे गटाकडून लोकसभेच्या १८ जागांवर दावा संजय राऊत यांच्या कडून करण्यात आला आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार यावरून देखील मविआमधील वाद चव्हाट्यावर आला आहे कारण अजित पवार यांचा डोळा काँग्रेसच्या मतदार संघावर आहे अश्या चर्चा सध्या सुरु आहेत.असाच वाद आता शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील निर्माण होण्याची शक्यता आहे.
भोसरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी आतापासूनच या मतदारसंघासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तसेच अस देखील म्हटलंजातंय कि अमोल कोल्हे पुढील नवडणूक नाही लढवणार शिरूर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणाला सुटणार हे अद्याप ठरलेलं नाहीये कारण ह्या जागेवर उद्धव ठाकरे देखील दावा करू शकतात.असं असतानाही राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी या मतदारसंघातून पुन्हा निवडून येण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र दुसरीकडे लांडे यांनी देखील याच मतदारसंघासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचं पहायला मिळत आहे. त्या मूळे लांडे कोल्हे यांना उघडपणे आव्हान देतायत का? असा सवाल स्थानिक नागरिकांना पडलाय. तरीही पुढील उमेदवार राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतेच ठरवतील
