RBI ची मोठी घोषणा; एक डिसेंबरला लॉन्च होणार डिजिटल रुपया

२९ नोव्हेंबर २०२२


भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) १ डिसेंबरपासून रिटेल डिजिटल रुपी लाँच करण्याची घोषणा केली असून किरकोळ डिजिटल चलनासाठी हा पहिला पायलट प्रोजेक्ट असेल. पायलट मोहिमेदरम्यान, डिजिटल रुपयाच्या उत्पादन, वितरण आणि किरकोळ वापराच्या संपूर्ण प्रक्रियेची चाचणी केली जाईल.

मंगळवारी जाहीर केलेल्या निवेदनात रिझर्व्ह बँकेने सांगितले की, वापरकर्ते सहभागी बँकांद्वारे ऑफर केलेल्या आणि मोबाईल फोन/डिव्हाइसवर संग्रहित डिजिटल वॉलेटद्वारे डिजिटल रुपया किंवा ई-रुपीसह व्यवहार करू शकतील. तर ई-रुपी डिजिटल टोकन म्हणून काम करेल. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) हे भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या चलनी नोटांचे डिजिटल स्वरूप असून चलनी नोटांप्रमाणे पूर्णपणे वैध आहे. त्याचा वापर व्यवहारांसाठी केला जाऊ शकतो.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *