परवानगी नसतानाही गौतमी पाटीलचा कार्यक्रम, आयोजकांवर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

पिंपरी : परवानगी नाकारलेली असतानाही गौतमी पाटील हिचा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला. याप्रकरणी आयोजकांच्या विरोधात म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. ३०) गुन्हा दाखल केला.
समीर रामदास गवारे, आनंद चिंतामण गवारे, विश्वनाथ शांताराम गवारे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस कर्मचारी शहानवाज मुलाणी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतमी पाटील यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचे मोई येथे मंगळवारी (दि. ३०) आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून परवानगी नाकारली होती. तरीही आयोजकांनी कार्यक्रम घेतला. तसेच पोलिसांनी दिलेल्या नोटिसचेदेखील पालन करण्यात आले नाही. गौतमी पाटील हिच्या गाण्यांच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होते. यातून काही ठिकाणी वादाचे प्रसंग घडले. त्यामुळे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी घेण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. असे असतानाही परवानगी नाकारल्यानंतरही गौतमी पाटील हिचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *