डिलिव्हरी बॉय चोरायचा सोसायटीतील सायकली, वाकड पोलिसांनी केली अटक

डिलेव्हरी करीत मोठया सोसायटींमध्ये प्रवेश करुन तेथील महागडया सायकली चोरुन त्या ओएलएक्स अॅपवर विकणा-या चोरट्यास अटक किं. रु.८५,०००/- च्या ०६ सायकली जप्त वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात चो-यांचे प्रमाण मोठया स्वरुपात वाढलेले असल्याने त्याअनुषंगाने विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, यांनी सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना जास्तीत जास्त पोलीस अंमलदार नेमुन सतर्क पेट्रोलींग करणेबाबत तसेच गुन्हे प्रकटीकरण विभागातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांना सक्त पेट्रोलींग करुन चोरीचे गुन्हयांना आळा घालणेबाबत आदेश दिले आहेत.

दरम्यान इसम नामे संदीप दिगंबर तांबे वय ४३ वर्षे व्यवसाय नोकरी रा. फ्लॅट नं. ४०४, इंद्रायणी अपार्टमेंट, सिध्दीविनायक कॉलनी, श्रिनगर रहाटणी पुणे यांनी पोलीस स्टेशनला येवून तक्रार दाखल केली की, त्यांचे मुलास घेतलेली सायकल एक अनोळखी इसमाने राहते बिल्डींगचे पार्कींग मधुन चोरुन नेली आहे, अशी तक्रार दाखल झाली.

सायकली चोरी होण्याचे प्रमाणे वाढल्याने गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकातील सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण व तपास पथक अंमलदार प्रतिबंधात्मक पेट्रोलींग करत गुन्हयांना आळा घालुन गुन्हे उघड करणेबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सिसीटीव्ही फुटेज व बातमीदारांचे मार्फत तपास सुरु केले असता असे निदर्शनास आले की, सदरचा अनोळखी चोरटा हा डिलेव्हरी बॉय असुन तो डिलेव्हरी देणेचे बहाण्याने सोसायटी मध्ये प्रवेश करून तेथील महागडया सायकली चोरी करीत आहे. अशी माहीती मिळालेने त्या अनुषंगाने तपास सुरु केला.

पोउपनि सचिन चव्हाण व त्याचे दिमतीस असलेला पोलीस स्टाफ असे रहाटणी परीसरात पेट्रोलींग करीत असताना त्यांना माहीती मिळाली की एक इसम चोरीची सायकल विक्री करणेकरीता तापकीर मळा चौकाजवळ येणार आहे. अशी माहीती मिळालेने पोउपनि सचिन चव्हाण व त्याचे सोबतचे पोलीस स्टाफने मिळाले बातमीचे ठिकाणी सापळा रचुन थांबले. मिळाले बातमी प्रमाणे एक इसम सायकलवर तेथे आला त्याचे बाबत खात्री झालेने त्यास ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव राहुल रविंद्र पवार वय २५ वर्षे रा. श्रीकृष्ण कॉलनी नं.०१, श्रिकृष्ण जिमच्या बाजुला, काळेवाडी पुणे असे सांगीतले त्याचे ताब्यातील सायकल बाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्याचेकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने गुन्हयाची कबुली देवुन सांगीतले की, मी डिलेव्हरी बॉय असुन जेथे जेथे डिलेव्हरी देणेकरीता जात असे तेथे लावलेले सायकलींवर पाळत ठेवून वेळ मिळाला की, सदरच्या सायकली चोरुन त्या ओएलएक्स अॅपवर जाहीरात देवून लोकांना विकत होतो असे सांगुन किं.रु.८५,०००/- च्या एकुण ०६ महागड्या सायकली काढुन दिल्या त्या जप्त करणेत आल्या असून अधिक तपास करीत आहोत.

सदरची कारवाई विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, डॉ. संजय शिंदे सो सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे सगो, पोलीस उप आयुक्त, परि-२, पिंपरी चिंचवड, श्रीकांत डिसले, सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक गुन्हे-२, सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफो. विभीषण कन्हेरकर, सपोफी बाबाजान इनामदार, सपोफी, राजेंद्र काळे, पोहवा बंदु गिरे, पोहवा संतोष बर्गे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. दिपक सावळे, पोहवा अतिश जाधव, पोहवा, प्रमोद कदम, पोना, अतिक शेख, पोना. विक्रांत चव्हाण, पोना, प्रशांत गिलबीले, पोशि अजय फल्ले, पोशि तात्या शिंदे, पोशि स्वप्निल लोखंडे, पोशि सौदागर लामतुरे, पोशि. विनायक घारगे, पोशि रमेश खेडकर, पोशि कौर्तय खराडे, पोशि भास्कर भारती, तसेच परिमंडळ-०२ कडील पोशि.पंडीत यांनी मिळून केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *