मंचर-रांजणी रस्त्याची खड्डयांमुळे दुर्दशा,आंबेगाव तालुका ग्राहक पंचायतच्या वतीने राज्य कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन…

मंचर : – आंबेगाव ब्युरोचिफ मोसीन काठेवाडी
आंबेगाव तालुक्यातील मंचर-रांजणी रस्त्याची खड्डयांमुळे दुर्दशा झाली असून तो त्वरित दुरुस्त करण्यात यावा म्हणून पुणे जिल्हा ग्राहक पंचयतीचे सचिव नितीन मिंडे यांच्या नेतृत्वाखाली आंबेगाव तालुका ग्राहक पंचायतीचे शिष्टमंडळाने राज्य कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना मंचर येथे निवेदन देण्यात आले..
यावेळी आंबेगाव तालुका अध्यक्ष सुभाष मावकर, सचिव सुदाम भालेराव, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर उंडे, संघटक देविदास काळे ,गणेश थोरात अजित इंदोरे योगेश चिखले ,उत्तमराव राक्षे, वेदांत काळे, प्रवीण विश्वासराव, विजय थोरात प्रशांत चवरे, संतोष बांगर, विग्नाहर काळे, सहसंगटक दगडू लोखंडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मंचर-रांजणी हा रस्ता पूर्व महाराष्ट्रातील भाविकांना भीमाशंकर ला येण्यासाठी अहमदनगर-बेल्हे मार्गे जवळचा रस्ता म्हणून मानला जातो. परंतू या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे.
याबाबत चे निवेदन या पुर्वी या भागातील उपअभियंता व कार्यकारी अभियंता उत्तर पुणे विभाग यांना दिले होते.
परंतू त्यांनी या बाबत फक्त मलमपट्टी ची भूमिका घेतली, तसेच काही जाणकारांच्या मते जेवढा भाग दुरुस्त करण्यात आला ,त्यात काही ठिकाणी निकृष्ठ दर्जाचे काम झाले आहे,
तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला खडीचे ढिगारे धूळखात पडले आहेत. ते म्हणजे
“असून अडचण नसून खोळंबा” असे झाले आहे.

त्यामुळे या मार्गावर प्रवास करणारे प्रवासी त्रस्त झाले आहेत, तर शेतकऱ्यांना आपला शेतमाल मंचर बाजार समितीकडे नेताना खंड्यामधे वाहन आदळून वाहनाचे नुकसान होत आहे ,
व अधिकारी कर्मचारी मात्र याकडे फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.
त्यामुळे राज्य कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पुणे जिल्हा ग्राहक पंचयतीचे सचिव नितीन मिंडे यांनी शिष्टमंडळासह भेटून निवेदन दिले, असून हा रस्ता जलद गतीने दुरुस्त करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे.