मराठा समाजाने एकजुटीने राहिले पाहिजे- पुरषोत्तम खेडेकर

पुणे – मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम खेडेकर यांनी सामाजिक चळवळीतील ॲड. मिलिंद द. पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. सध्या देश अस्वस्थ झाला आहे. ज्या ज्या वेळी देश अडचणीत आला त्या तुलनेत वेळी महाराष्ट्र ऊभा राहिला आहे हा इतिहास आहे. असे पुरषोत्तम खेडेकर यांनी त्यांनी त्यांचें मत व्यक्त केले. त्याप्रसंगी ॲड पवार यांनी खेडेकर यांचा शाॅल, श्रीफळ व ‘रिअल अचिवर्स’ हे पुस्तक देऊन पुरषोत्तम खेडेकर यांना सन्मानित केले.
श्री. पुरुषोत्तम खेडेकर हे मराठा सेवा संघ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. शिवधर्म हा जगातील सतरावा धर्म आहे. अभ्यास व संशोधन करून त्यांनी शिवधर्म स्थापन केला. पुरुषोत्तम खेडेकर यांनी ०१ सप्टेंबर १९९० रोजी महाराष्ट्रातील जिल्हा अकोला येथे मराठा सेवा संघाची स्थापना केली. मराठा सेवा संघ व त्याला जोडून अनेक सलग्न संघटना खेडेकरांनी उभ्या केल्या आहेत. खेडेकरांच्या सौभाग्यवती सौ.रेखाताई खेडेकर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सदस्य राहिल्या आहेत. सध्या सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा येथे, मा जिजाबाई यांच्या जन्मस्थळी मा जिजाऊ सॄष्टी उभं करण्याचं मोठं काम खेडेकर साहेब करित आहेत.
खेडेकर म्हणाले देशाची सध्याची अवस्था व अस्वस्थतेची परिस्थिती पाहता मराठा समाजाने एकजुटीने राहून काम करणं गरजेचं आहे. शरद पवारांना शिवाजी समजून आपण त्यांचे मावळे बनून पवारांना मदत केली पाहिजे व दिल्ली काबीज केली पाहिजे. त्याशिवाय देशातील असस्वथा संपणार नाही असे मत पुरषोत्तम खेडेकरांनी व्यक्त केले.
याप्रसंगी शास्त्रज्ञ डॉ. शैलेश पवार, पुणे बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष ॲड. योगेश पवार, ॲड संजय जगताप, विजय जगताप आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *