भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी? शिंदे गटाच्या खासदाराच्या आरोपाने एकाच खळबळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
सेनेतील बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडल. यानंतर भाजप तसेच शिंदे गटाने एकत्र येत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली.. मात्र अद्यापही सर्वकाही आलबेल असल्याचं दिसत नाहीये. कारण म्हणजे ज्येष्ठ खासदार गजानन किर्तीकर यांनी भाजपबद्दल केलेलं खळबळजनक वक्तव्य.
गजानन किर्तीकर यांनी माध्यमांशी बोलताना भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचं गंभीर आरोप केला आहे. “आम्ही शिवसेनेचे १३ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. यापूर्वी आम्ही एनडीएचे घटक नव्हतो, परंतु आम्ही आता  एनडीएचे सोबत आहोत. त्यामुळे आमची देखील विकास कामे त्या पद्धतीने व्हायला हवीत. पण तसे होत नसल्याचं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे भाजपकडून सापत्न वागणूक मिळत आहे,” असा आरोप किर्तीकर यांनी केला आहे. फक्त कीर्तीकरच नव्हे तर ह्या आधी देखील शिंदे-भाजप मधील  अनेख वाद चव्हाट्यावर आले आहेत.

तसचे कीर्तिकर माणहले “२०१९ साली भाजप आणि शिवसेना एकत्र लढलो होतो. तर भाजपने 26 जागा घेत त्यांचे 23 खासदार निवडून आले. शिवसेनेच्या 22 जागा होत्या. त्यावेळी आमचे 18 खासदार निवडून आले होते. त्यामुळे आताही आम्ही 22 जागा लढणार आहोत, असेही गजानन किर्तीकर यांनी सांगितलं.

तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ह्यांनी शिंदे गटाला डिवचत त्यांच्यावर निशाणा साधलाय
“शिंदे गट हा कोणताही पक्ष नाही. भारतीय जनता पक्षाने पाळलेला तो एक कोंबड्यांचा खुराडा आहे. या कोंबड्या अधीही कापल्या जातील” तसेच शिंदेगटाला लोकसभेसाठी केवळ 5 जागा मिळतील असे राऊत माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *