नथुराम गोडसे च्या भूमिकेवरून खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याकडून आत्मक्लेश

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
३१ जानेवारी २०२२

आळंदी


“व्हाय आय किल गांधी” या चित्रपटात नथुरामची भूमिका केल्या मुळे सर्वत्र टीकेचे धनी ठरलेले शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी आज आळंदी येथील महात्मा गांधींच्या स्मारकासमोर आदरांजली व्यक्त करत या भूमिकेवरून भावना दुखावलेल्या गांधीवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे व प्रत्यक्ष दिलगिरी व्यक्त केलीय. महात्मा गांधी पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला  दि २९ रोजी आळंदी येथील इंद्रायणी घाटावर असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाला भेट देऊन त्यांनी आदरांजली वाहिली. आणि आत्मक्लेश करीत या चित्रपटात नथुरामची भूमिका केल्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त केली.

आळंदी येथील महात्मा गांधींच्या स्मारकाजवळ डॉक्टर कोल्हे यांची क्षमायाचना

‘व्हाय आय किल गांधी’ चित्रपटात नथुरामची भूमिका केली त्यांना पण ती विचारधारा स्वीकारली असा त्याचा अर्थ अजिबात नाही हे स्पष्ट करताना एखादं नाटक, लेख किंवा एखाद्या चित्रपटामुळे महात्मा गांधी यांची विचारधारा पुसली जाणार नाही. मात्र या भूमिकेवर तरुणांमध्ये ज्या प्रकारे प्रतिक्रिया उमटली ती पाहाता यातून गांधींजींचे विचार आजही तरुणाईत तितकेच प्रभावीपणे रुजले असल्याचे दिसून आले ही महत्त्वाची बाब आहे. महात्मा गांधी यांच्या खुनाचे आपण कधीही समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही हे मी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र या भूमिकेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त केली. असे देखील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी प्रसिद्धीपत्रका मध्ये म्हटले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *