क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून विघ्नहर विद्यालयातील 200 विद्यार्थ्यांनी घेतला कोव्हॅक्सिन लसीचा लाभ

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
३ जानेवारी २०२२

ओझर


श्री शिक्षणाच्याजननी , भारतातील प्रथम महिला शिक्षिका ,मुख्याध्यापिका ,स्फूर्तीनायिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून व महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये ओझर येथील विघ्नहर विद्यालयात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत वयोगट 15 ते 18 या वयोगटातीलतील विद्यार्थ्यांना कोव्हँक्सीन लसीचे लसीकरण करण्यात आले. या लसीकरणाचे उद्घाटन जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके व विघ्नहर देवस्थानचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

या लसीकरण कार्यक्रमाच्या वेळी विद्यालयातील मुख्याध्यापक गणेश राऊत सर ,देवडे सर ,सगर सर सर्व शिक्षकवृंद ,विद्यार्थी वर्ग तसेच ओझर १ व २ चे सरपंच सौ.तारामती कर्डक ,सौ. मथुरा ताई कवडे ,हिवरे गावचे सरपंच निलेश बेनके देवस्थान ट्रस्ट चे माजी उपाध्यक्ष रंगनाथ रवळे ,ओझर ग्रामपंचायत सदस्य शिरीष बोऱ्हाडे ,मीराताई जगदाळे ,शहाजी रवळे ,अंबादास वाळुंज, माजी सरपंच सुरेश टेंभकर ,तसेच नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी वर्षाताई गुंजाळ ,आभा त्रिपाठी ,आरोग्य सेविका आयोध्या हांडे ,आरोग्यसेवक करण परदेसी ,अजय कासविद ,आशा वर्कर्स हसीना शेख ,छाया बेनके ,मीना राऊत ,शुभांगी मांडे ,वृषाली घेगडे ,रोषणा आवटी व वाहन चालक भगवान डेरे ,गावकरी वर्ग व पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते. या विद्यालयांमध्ये दिवसभरात जवळजवळ दोनशे विद्यार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घेतला. तसेच शाळा अंतर्गत विद्यार्थ्यांनाही या ठिकाणी लस देण्यात आली. मोठ्या वयोगटा नंतर बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लहान मुलांना ही लस देण्यात आली याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत होते. ह्या दरम्यानच्या काळात ओझरकर ग्रामस्थांच्या वतीने आशाताई बुचके यांचा शाल ,श्रीफळ व श्रींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.


 

One thought on “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून विघ्नहर विद्यालयातील 200 विद्यार्थ्यांनी घेतला कोव्हॅक्सिन लसीचा लाभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *