श्री मुक्ताई देवीच्या यात्रेत सलग आठ दिवस तमाशाचे कार्यक्रम

उत्तर पुणे जिल्ह्यातील नारायणगावची सर्वात मोठी यात्रा रविवारपासून सुरू

नारायणगाव :- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)

लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले व राज्य शासनाचा ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळालेल्या प्रथम पर्यटन तालुका जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील ग्रामदैवत श्री मुक्ताई देवी व काळोबा देवाची यात्रा आज रविवार दि.१६ एप्रिल ते २३ एप्रिल २०२३ पर्यंत आठ दिवस भरणार आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वात मोठ्या भरणाऱ्या यात्रेचे श्री मुक्ताई देवस्थान ट्रस्टच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. देवस्थान पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत मांडव डहाळे, देवीस चोळी पातळ, शेरणी वाटप, छबिना मिरवणूक, कुस्त्यांचा आखाडा, शोभेचे दारूकाम, लोकनाट्य तमाशा, सुरक्षा व्यवस्था, पिण्याचे स्वच्छ पाणी, पार्किंग व्यवस्था, पाळणे व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देणे व अग्निशामक यंत्रणेचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष एकनाथ शेटे, सुजित खैरे व संतोष वाजगे यांनी दिली. यावेळी माजी सरपंच योगेश पाटे, विघ्नहर चे संचालक संतोष नाना खैरे, अशोक पाटे, एम.डी. भुजबळ, डी.के. भुजबळ, दादाभाऊ खैरे, राजाराम पाटे, विकास तोडकर, सुहास वाजगे, अजित वाजगे, गणेश वाजगे, बबन खैरे, मुरलीधर फुलसुंदर, विलास पाटे आदी मान्यवर उपस्थित होते
रविवारी (दि.१६) सकाळी ९ वा नारायणगाव शहरातुन उत्सवमूर्ती व पादुकांची मंदिरापर्यत भव्य मिरवणूक, सायंकाळी कै. तुकाराम खेडकर सह पाडुरंग मुळे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेची मिरवणूक, रात्री भजन व कै. चंद्रकांत ढवळपुरीकर व किरणकुमार ढवळपुरीकर तमाशा.
सोमवार (दि.१७) सकाळी देवीचा उत्सव, मांडवडहाळे व देवीस शेरणी नैवेद्य, सायंकाळी कै.भाऊ बापू (मांग) नारायणगांवकर व स्व.विठाबाई भाऊ मांग नारायणगांवकर यांची पुण्यतिथी, रात्री ढोलताशांचा गजरात घागरी मिरवणूक, अंजलीराजे नाशिककर तमाशा.
मुख्य दिवस …मंगळवार (दि.१८) सकाळी देवीस व काळोबा देवास मांडव डहाळे, चोळी पातळ व देवीस शेरणी नैवेद्य, सायंकाळी छत्रपती शाहु महाराज व महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त भव्य मिरवणूक ,सायंकाळी भजन, रात्री छबीना मिरवणूक, शोभेचे दारूकाम, कै. तुकाराम खेडकर सह पांडूरंग मुळे मांजरवाडीकर तमाशा.
बुधवार (दि.१९) दुपारी कुस्त्यांचा जंगी आखाडा,रात्री मालती इनामदार नारायणगांवकर तमाशा. गुरुवार (दि.२०) सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक, रात्री कैलास नारायणगांवकर तमाशा. शुक्रवार (दि.२१) शिवजयंती उत्सव, रात्री सौ. मंगला बनसोडे करवंडीकर सह नितीन बनसोडे करवंडीकर तमाशा. शनिवार (दि.२२) रात्री भिका भीमा सांगवीकर लोकनाट्य तमाशा. रविवार (दि.२३) रात्री प्रकाश आहिरेकर सह निलेश आहिरेकर लोकनाट्य तमाशा.

——————————
श्री मुक्ताई देवीच्या यात्रेत भाविकांचे गर्दी विचारात घेऊन विशेष सुरक्षारक्षकांसह पोलीस बंदोबस्त व देवस्थान ट्रस्टच्या वतीने ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून संपूर्ण यात्रेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *