शिवसेना सत्ता संघर्षाच्या निकालाची तारीख ठरली ! ह्या दिवशी होणार शिंदे व ठाकरेंच्या सेनेचा फेसला !

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मोठी घडामोड समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या शिवसेना सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु होती. सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गट व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची बाजू ऐकून घेतली.एकंदरीत १० महिने चाललेल्या ह्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून अनेक गोष्टी अधोरेखित केलेल्या, हे प्रकरण संविधान पिठाकडे गेल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणाच्या निकालाकडे लागून आहे. दरम्यान सुनावणी संपल्यानंतर या प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता आणि निकाल कोणाच्या बाजूने लागतो ह्याची उत्सुकता सर्वानाच होती.

आत्ता न्यायालयाच्या निर्णयाबद्दल मोठी बातमी  समोर आली आहे.सत्तासंघर्षाच्या प्रकरणाचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाणार असल्याची माहिती आहे. घटनातज्ञांच्या मते सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणाचा निकाल १० मे नंतर १६ मे च्या आधी कुठल्याही दिवशी जाहीर केला जाऊ शकतो. या प्रकरणाच्या निकालाकडे आता सर्वांचं लक्ष लागून असून न्यायालय काय निर्णय देणार हे बघण औत्सुक्याचं राहणार आहे. तसेच शिवसेना कोणाची ह्याचा देखील फैसला होणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *