श्री मुक्ताई देवीच्या यात्रेनिमित्त चार कोटींचे संरक्षक विमा कवच

विक्रांत क्रीडा मंडळाचा उपक्रम

महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्राचा ब दर्जा लाभलेल्या नारायणगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताई व काळोबा देवाची यात्रा आठ दिवस चालणार असून विक्रांत क्रीडा मंडळ व संतोष वाजगे मित्रपरिवाराने यात्रा परिसरात असणाऱ्या आस्थापना व भाविकांसाठी चार कोटी रुपयांचा संरक्षक विमा आज उतरविला आहे. श्री मुक्ताई देवीच्या यात्रेत रविवार दिनांक १६ ते २३ एप्रिल या आठ दिवसात लाखो भाविक येणार असून मोठी गर्दी होणार असल्याने भाविकांसाठी संरक्षक विम्याची समाजोपयोगी योजना राबविण्यात आली आहे. माजी उपसरपंच संतोष वाजगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या संरक्षण विम्याचा फायदा आकाश पाळण्यातील दुर्घटना, मिरवणुकीतील चेंगराचेंगरी, वेगवेगळ्या स्टॉल्स वरील दुर्घटना, कुस्तीच्या आखाड्यात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ३ कोटी तर तमाशातील राहूट्या, खाऊ गल्लीतील सिलेंडर दुर्घटनेमुळे आग लागल्यास १ कोटी रुपयांचा संरक्षक विमा कवच लाभदायक ठरणार आहे. श्री मुक्ताई देवीच्या यात्रेत संतोष वाजगे मित्रमंडळाने पहिल्यांदाच हा उपक्रम राबविला असून मंडळाचे मुक्ताई देवस्थान यात्रा कमिटीने व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. मंडळाने यात्रेतील भाविकांना संरक्षक विमा कवच देत असल्याचे प्रमाणपत्र देवस्थान यात्रा कमिटीला दिले आहे. यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष एकनाथ शेटे, सुजित खैरे, संतोष वाजगे, नारायणगाव सोसायटीचे चेअरमन संतोष खैरे, व्हाईस चेअरमन किरण वाजगे, सरपंच योगेश पाटे, अशोक पाटे, विलास पाटे, डी. के.भुजबळ, रोहिदास केदारी, अजित वाजगे, विलास पानसरे, राजेंद्र कोल्हे, आशिष वाजगे, चेतन पडघम, अमर वाजगे, प्रदीप कोकणे, विघ्नहर वाजगे, निलेश गोरडे, मुकेश वाजगे, सचिन कोराळे, अतुल वाजगे, गणेश वाजगे, संतोष दांगट, रुपेश वाजगे, ऋषी वाजगे, तेजस वाजगे, सुदीप कसाबे, अक्षय वाव्हळ आदी मान्यवर उपस्थित होते.

 

श्री मुक्ताई देवीच्या यात्रेत भाविकांना व सर्व अस्थापनांसाठी विमा कवच देत असल्याचे प्रमाणपत्र देताना संतोष वाजगे मित्र मंडळाचे कार्यकर्ते व यात्रा कमिटीचे पदाधिकारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *