रुपया कमजोर होत नसून तर डॉलर मजबूत होतोय – निर्मला सीतारमण

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१७ ऑक्टोबर २०२२


डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण झाल्यानंतर विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत. मागील काही दिवसांपासून जागतिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींमुळे रुपयाचे सातत्याने अवमूल्यन होत आहे. मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुपयाचे मूल्य तब्बल ८३ पैशांनी घसरले होते. गेल्या सात महिन्यांतील ही सर्वात मोठी पडझड होती.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रुपयाच्या घसरणीवर प्रतिक्रिया दिली आहे. रुपयाचे अवमूल्यन होत नसून डॉलर मजबूत होत आहे. तसेच रुपया इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे. रुपयाची पडझड रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सातत्याने प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *