युवक काँग्रेसचे मोदींच्या विरोधात उपाहासात्मक फलक आंदोलन…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

चिंचवड दि. ०२ मार्च २०२१
केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकार ने पेट्रोल व डिझेल सोबतच केलेल्या भरमसाठ गॅस दरवाढीला विरोध करत पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस च्या वतीने आज अनोखे फलक आंदोलन करण्यात आले.

चिंचवड चौकातील पेट्रोल पंपा लगतच मोदींचा फलका द्वारे उपाहासात्मक निषेध करण्यात आला यात युवक काँग्रेस कडून उभारण्यात आलेल्या फ्लेक्स वर मोदींना गांधी जीं च्या तीन माकडां प्रमाणेदर्शविण्यात आले व महागाई च्या या भयानक सद्य परिस्थिती वर मोदींचे मौन, डोळेझाक व दुर्लक्ष याची तुलना करुन निषेध फलकाद्वारे दर्शविण्यात आले.

याबाबत माहीती देताना युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले,
नुकताच देश कोरोना च्या संकटातून सावरतोय तोच लगेच भाजपाच्या मोदी सरकारने पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढ करत देशातील जनतेला नव्या संकटात टाकले आहे. पेट्रोल डिझेल च्या दराने जवळपास शंभरी गाठल्याने सर्वसामान्यांना आधीच फटका बसलेला असताना आता एल पी जी सिलेंडर दरात सोमवारी २५ रूपयांनी वाढ करण्यात आली. आता १४.२ किलोचा गॅस सिलेंडरचा दर प्रति सिलेंडर १२५ रूपयांनी वाढला आहे व आज सिलेंडर रू.८१९/-आत्ता झाला आहे.
यापूर्वी ४ फेब्रुवारी रोजी २५ रू., १५ फेब्रुवारी रोजी ५० रू., व २५ फेब्रुवारी रोजी २५रू. अशी जवळपास एका महिन्यातच केलेली ही चौथी दरवाढ आहे.
या नागरिकांच्या मुलभूत निकडीच्या व दैनंदिन गरजांबाबत बाबत मोदींजीचे वर्तन हे कूछ मत देखो, कूछ मत बोलो व कूछ मत सुनो असे झाले आहे. त्यांच्या या वर्तनाचा निषेध व त्यांचे हे रूप जनतेच्या समोर आणण्यासाठी हे फलक आंदोलन केले, असे बनसोडे यांनी सांगितले.

या वेळी गॅस दरवाढी विरोधात, भाजपा विरोधात व मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अक्षय जैन, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस सोशल मिडीया विभागाचे अध्यक्ष आयुष मंगल,कष्टकरी कामगार पंचायतीचे नेते प्रल्हाद कांबळे, युवक काँग्रेस चे शहर सरचिटणीस शंकर ढोरे, विरेंद्र गायकवाड, अनिल सोनकांबळे, मिलिंद बनसोडे, अलोक लाड, विशाल सरवदे, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, अर्णव कामठे, तेजस पाटील, ओंकार पवार,प्रविण जाधव, पांडूरंग वीर, रोहीत सोनावले आदि पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *