अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन
पिंपरी-चिंचवड : नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन हे राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत. जो बायडन यांच्या विजया नंतर त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
भारतामधून देखील बायडन यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.पण या शुभेच्छा राजकीय नसून पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी जो बायडन यांना Twitter द्वारे शुभेच्छा देत हस्तांदोलन करत असल्याचा फोटो पोस्ट केला आहे.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी हस्तांदोलन करतानाचा एक फोटो पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी ट्विटर आणि फेसबुकवर पोस्ट केला असून, हा फोटो व्हायरल झाला आहे.
बायडन २००९ ते २०१७ या कालावधीत अमेरिकेचे उपाध्यक्ष होते. या दरम्यान २०१३मध्ये ते मुंबईत आले होते. तेव्हा त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी तत्कालीन अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून मुंबईत नियुक्तीस असणारे कृष्णप्रकाश यांच्यावर होती. त्या वेळी काढलेला फोटो कृष्णप्रकाश यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत बायडन यांनी डोनाल्ड ट्रंपयांचा पराभव करून विजय मिळवताच फेसबूक आणि ट्विटर वर पोस्ट सोशल मीडियावर बायडन यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
बायडन यांच्या भेटीबद्दल कृष्णप्रकाश म्हणाले, ‘जो बायडन अमेरिकचे उपाध्यक्ष असताना २०१३ मध्ये मुंबईत आले होते. त्या वेळी मी दक्षिण मुंबई विभागात अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होतो. बायडन यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर होती. बायडन यांच्या दौऱ्यात मुंबई पोलिसांनी उत्तम सुरक्षा पुरवली. त्यानंतर बायडन यांनी मला बोलावून सर्व पोलिसांचे आभार मानले, तसेच हस्तांदोलन करून कौतुकाची थाप दिली होती. त्यांच्या विजया नंतर हा फोटो फेसबूक आणि ट्विटर वर पोस्ट केला आहे…