मोटरसायकल चोरी प्रकरणी दोन म्होरक्यांसह नऊ जणांना ठोकल्या बेड्या

नारायणगाव

किरण वाजगे, कार्यकारी संपादक

दहा लाख रुपये किमतीच्या २९ मोटरसायकली जप्त


स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत मोटार सायकल चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या दोन म्होरक्यांसह एकूण नऊ जणांना जेरबंद केले. त्यांच्याकडून दहा लाख रूपयांच्या २९ मोटार सायकल हस्तगत केल्या .
पुणे जिल्हयात मागील वर्षभरात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते त्या अनुषंगाने पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मोटार सायकल चोरी बाबत वैयक्तीक दृष्टया लक्ष्य देवून कारवाई करणेबाबत सुचना केल्या होत्या.पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पुणे जिल्हातील मोटारसायकल चोरीचा आढावा घेत मोटारसायकल चोरी करण्याची निवडलेली ठिकाणे,चोरी करण्यासाठी येणारे जाणारे मार्ग, याचा बारकाईने अभ्यास करत कारवाई साठी प्रथम पुणे-नाशिक रोडची निवड केली आणि एक पथक स्थापन केले.
जुन्नर विभागात स्थानिक गुन्हे शाखेचे काम करणारे सपो निरिक्षक महादेव शेलार, पो.हवालदार दिपक सावळे, पो.ना. सदिष वारे, पो.कों. अक्षय नवले या पथकाला मोटार सायकल चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीची गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीचे आधारे कारवाई करून कारवाईचे अहमदनगर जिल्हयातील आंतरजिल्हा टोळीच्या मुख्य दोन जणांना जांबूत फाटा परीसरातून ताब्यात घेतले.
पुणे ग्रामीण,अहमदनगर, ठाणे ग्रामीण जिल्हयातील मोटारसायकल व घरपोड़ी असे एकूण २६ गुन्हे उघडकीस आणले असून एकूण दहा लाख रूपये किंमतीच्या २९ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. चोरी गेलेल्या मोटारसायकल या ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग तसेच नोकरदार वर्गाच्या आहेत.
पथकाने ताब्यात घेतलेल्या संशयित इसमांची नावे अमोल नवनाथ मधे रा. वाघवाडी पोखरी ता पारनेर जि अहमदनगर , विजय संजय मधे रा. निमदरी ता पारनेर जि अहमदनगर, संतोष उमेश मधे रा. पोखरी ता. पारनेर जि अहमदनगर, संदिप सुभाष मधे, रा. पोखरी संगमनेर, जि. अहमदनगर, विकास साहेबराव मधे, रा. पवळदरा मधेवस्ती पोखरी ता.पारनेर जि अहमदनगर, विजय विठ्ठल जाधव कुरकुंडी ता. संगमनेर जि. अहमदनगर, सुनील वामन मेंगाळ रा. बोटा ता. संगमनेर, भारत पोपट मेंगाळ रा. गारोळे पठार ता.संगमनेर जि.अहमदनगर, मयूर गंगाराम मेंगाल रा.अंबिदुमाला. ता संगमनेर जि.अ नगर अशी आहेत.
आरोपी क्र.१ ते ५ याना नारायणगाव पोलीस स्टेशन येथे तपासासाठी ठेवण्यात आले असून आरोपी आरोपी क्र.६ ते
९ यांना ओतूर पोलीस स्टेशन येथे तपासासाठी ठेवण्यात आले आहे.
कारवाई ही पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनि महादेव शेलार, पोसई गणेश जगदाळे, तुषार पंधारे, हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, मंगेश धिगळे, राजू मोमिन, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, संदिप वारे ,अक्षय नवले,मुकुंद कदम यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *