शिंदे सरकार कोसळणार ? भाजपच्या नेत्यांकडून ग्रीन सिग्नल मिळेना ?

दि. १७/०१/२०२३

पिंपरी

 

पिंपरी : शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यातून अनेक आमदारांना डावलण्यात आलं. त्यामुळ मंत्रिपदाची आस धरून बसलेले अनेक भाजप आमदार तसेच शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. शिंदे-फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल ४० दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. त्यात शिंदे आणि फडणवीस गटाकडून १८ आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदी संधी देण्यात आली होती. पहिल्या विस्तारात संधी न मिळाल्याने शिंदे आणि भाजपमधील काही आमदार नाराज झाले आहेत.असं असताना आता शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या नेत्याला मंत्रिपद मिळणार याकडे नाराज नेत्यांचं लक्ष लागून आहे.

पहिल्या टप्प्यात शिंदे गटातील तानाजी सावंत,उदय सामंत, संदीपान भुमरे,दादा भुसे,अब्दुल सत्तार,दीपक केसरकर,शंभूराज देसाई,संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना संधी मिळाली.तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार,मंगलप्रभात लोढा,गिरीश महाजन,राधाकृष्ण विखे पाटील,सुरेश खाडे,रविंद्र चव्हाण,विजयकुमार गावित,अतुल सावे यांना मंत्रीपद मिळालं.

पहिल्या टप्प्यात शिंदे गटाला गृहखाते हवे होते. पण, भाजप गृहखात्यासाठी अडून बसला होता. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटत नव्हता. अखेर शिंदेनी दोन पावले मागे जात भाजपला गृहखाते आणि अर्थखाते दिल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला. पण आता दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात देखील शिंदेनाच झुकतं माप घ्यावं लागणार का ? शिंदेनी त्यांच्या नाराज आमदारांना मंत्रीपद देण्याचा शब्द दिलेला आहे. त्यामुळं शिंदे गटातल्या उर्वरित आमदाराना मंत्रीपद मिळालं नाही तर ते आमदार फुटणार ? असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. दरम्यान भाजपमधील काही आमदार मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आहेत. अशात देवेंद्र फडणवीस नेमकी काय खेळी खेळणार ? मंत्रीपदाची आस लागून राहिलेले भाजप-शिंदे गटातील नाराज आमदार मंत्री होणार ? असा प्रश्न उपस्थित होतो. एकीकडे हा प्रश्न असताना मंत्रिमंडळाचा विस्तारच 2024 नंतरच होणार असं बच्चू कडू म्हणालेत. मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही अशी मानसिकता आमदारांनी बनवली आहे असही ते म्हणालेत.त्यामुळं शिंदे गटातल्या प्रत्येक आमदाराला मंत्रीपद मिळालं नाही तर आमदार फुटणार ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *