कासब्यात धंगेकरांचा ऐतिहासिक विजय २८ वर्षाची परंपरा मोडीत निघाली, हेमंत रासणेंनी पराभव केला मान्य

पुणे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा ११ हजार ४० मतांनी दणदणीत विजय झाला असून भाजपचे हेमंत रासने यांनी पराभव मान्य केला.
अगदी पहिल्यापासूनच रवींद्र धंगेकर ठामपणे सांगत होते विजय हा आमचाच होणार आहे. सकाळीच बाहेर पडल्यावर त्यांनी विजयी होणार असल्याचे सांगितले होते. त्यांची देहबोलीच सांगत होती ते कार्यकर्त्यांसह नाश्त्यासाठी मिसळ खायला गेले गेले तेव्हाही सांगितले मी पहिल्या फेरीत जी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहणार आहे.
आणि झालेही तसेच झाले पहिल्या फेरीपासून जी आघाडी घेतली ती कसब्यात थोडी कमी झाली होती.
पण नंतर मतमोजणीत आघाडी वाढत च गेली ती शेवटपर्यंत तशीच अबाधित ठेवण्यात ते यशस्वी ठरले. महाविकास आघाडीबरोबरच मनसेनही आम्हाला मदत केल्याचे एक वृत्तवाहिनीला बोलताना सांगितले. अगदी सुरुवातीपासूनच मतदारांचा कल धंगेकर यांच्या बाजूने असल्याचे दिसून आले.
भाजपकडून पुण्यात पैसे वाटल्याच्या क्लिप समोर आल्या होत्या त्याचाही फायदा महाविकास आघाडीला झाल्याचे जाणकार सांगतात. भाजपच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक मंत्र्यांनी हजेरी लावली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर पुण्यात तळ ठोकून होते. अखेर धंगेकरांचा विजय झाल्यावर हेमंत रासने यांनी आपला पराभव मान्य केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *