ओतूर पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह

दि. १९/०१/२०२३

कैलास बोडके : प्रतिनिधी

ओतूर

 

ओतूर : ओतूर, ता.जुन्नर येथे दिनांक ११ ते १७ जानेवारी या कालावधीत ओतूर पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात ३४ वा रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आल्याची माहिती ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या आदेशानुसार व जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. सुरक्षा सप्ताह दरम्यान वाहन चालक मालक यांना एकत्र करून प्रवास करताना घ्यावयाची काळजी,वेगावर नियंत्रण राखणे, महामार्गावरिल लेन बदलताना दक्षता बाळगण्या विषयीची महत्वपूर्ण माहिती देण्यात आली. तसेच विविध शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाबद्द्ल सखोल माहिती देण्यात आली.

वाहनांना स्टिकर व रिफ्लेक्टरही लावण्यात येवून सुरक्षिततेची माहितीपत्रके वाटप करण्यात आली. या वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम देखील राबविण्यात आले. रस्ता सुरक्षा सप्ताह कालावधीत सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, मोटर वाहक निरीक्षक अंजली पाथरे, सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक प्रियांका जाधव,पोलीस नाईक दत्ता तळपाडे,पोलीस नाईक सुरेश गेंगजे,पोलीस शिपाई श्यामसुंदर जायभाये, ट्रॅफिक वार्डन अमोल मडके, गोरक्षनाथ गवारी आदी पोलिस कर्मचाऱ्यानी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *