टपाली मतदान मतमोजणीने चिंचवड मतदार संघातील मतमोजणीला सुरुवात

पुणे,दि.०१:-

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सुरुवात टपालाने प्राप्त झालेल्या मतदान मतमोजणीने आज सकाळी आठच्या सुमारास
थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांचे प्रतिनिधी आणि निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत मतपेटी कक्षाचे सील काढण्यात आले.

निवडणूक निरिक्षक एस. सत्यनारायण, निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, शितल वाकडे, निवडणूक सहाय्यक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, निवडणूक सहाय्यक प्रशांत शिंपी, थॉमस नरोन्हा, ईव्हीएम कक्षाचे समन्वयक बापूसाहेब गायकवाड, टपाली मतदान कक्षाचे समन्वयक राजेश आगळे, डॅशबोर्डच्या समन्वयक अनिता कोटलवार, माध्यम कक्ष समन्वयक किरण गायकवाड, निवडणूक सहाय्यक तथा नायब तहसीलदार श्वेता आल्हाट, संतोष सोनवणे यावेळी उपस्थित होते.

मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पर्यवेक्षक, सहायक आणि सूक्ष्म निरीक्षकांना मतमोजणी विषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने कर्तव्ये, जबाबदा-या आणि आवश्यक कामकाज याबद्दल या प्रशिक्षणामध्ये सविस्तर माहिती आणि सूचना देण्यात आल्या.

मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी १४ टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी १ टेबल असे एकूण १५ टेबल असणार आहेत. १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *