पर्यावरण प्रेमी नरसिंग लगड यांच्या वाढदिवसानिमित्त नदी स्वच्छतेसाठी मुठा नदी पात्रात सोडले ५००० मासे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१५ ऑक्टोबर २०२२

पुणे



आपला वाढदिवस केक कापून पार्टी देऊन साजरा केला जातो हे आपण नेहमीच पाहतो. पण पुण्यातील नांदेड सिटी डेव्हलपर्स चे संचालक वकील नरसिंग लगड यांनी सामाजिक भान ठेवत नद्यांमधील भयंकर प्रदूषण होताना दिसत आहे त्यामुळे त्यांनी आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या सहकारी आणि पर्यावरण प्रेमींच्या उपस्थितीत आणि सहकार्याने मुठा नदी पात्रात नदी स्वच्छतेसाठी जलकुंडात ५००० मासे सोडून आपला वाढदिवस साजरा केला.

 

यावेळी अनेक पर्यावरणवादी संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे विभागीय अधिकारी गंधे, माय अर्थ अनंत चे अनंत घरत, समग्र नदी परिवाराचे सुनील जोशी, मुकुंद शिंदे, ललित राठी आणि अनेक पर्यावरणवादी, शालेय विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

नदीचे पाणी नैसर्गिकरित्या स्वच्छ राहावे आणि व्हावी यासाठी नैसर्गिक कर्दळी, आळू अशा वनस्पतींची लागवडही नदी पात्रात करण्यात आली. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे उपस्थितांनी कैतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *