आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गोहे.बु येथे पाण्याची मोटार चोरी : घोडेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
२५ मार्च २०२२

गोहे.बु


आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गोहे.बु उपळवाडी येथील ओढ्याच्या पात्रात असलेली ८ हजार रुपये किंमतीची पाण्याची मोटर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवार दि. २१ रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.याबाबतची फिर्याद शेतकरी संदीप धर्मा सुपे वय – २२ वर्ष,राहणार गोहे.बु दांगटवाडी ता. आंबेगाव जि. पुणे यांनी घोडेगाव पोलीस स्टेशन येथे दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,फिर्यादी यांची गोहे.बु उपळवाडी येथील ओढ्याच्या पात्रात टेक्समो कंपनीची थ्री फेज,३ एच.पी पाँवरची पाण्यातील मोटर बसवली होती.रविवार दि २१ रोजी सायंकाळी ६ ते सोमवार दि २२ रोजी सकाळी १० वाजल्याच्या सुमारास ओढ्यावर गेले असता तेथे मोटार दिसली नाही.फिर्यादी यांनी आजुबाजुला पाहिले असता मोटार मिळून आली नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची ८००० रुपये किंमतीची पाण्याची मोटार चोरून नेल्याची खात्री झाली असता त्यांनी याबाबत घोडेगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यामुळे अज्ञात चोरट्या विरुद्ध भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे घोडेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास, घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस नाईक अविनाश कालेकर हे करत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *