चेतन बेंद्रे यांचे निलंबन मागे घेतल्यामुळे आप च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

 

आपला आवाज न्यूज नेटवर्क 
दिनांक ०१ मार्च २०२३

फटाके वाजवून पेढे वाटत आपच्या कार्यकर्त्यांनी केला आनंद साजरा

 

पिंपरी चिंचवड शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांचे निलंबन मागे घेण्यात आले. यानिमित्त काल दि. 28 फेब्रुवारी रोजी कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून व पेढे भरवून आनंद व्यक्त करत चेतन बेंद्रे यांना शुभेच्छा दिल्या.

काल संध्याकाळी सात वाजता संत तुकाराम नगर येथील आम आदमी पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय मध्ये आपचे शहरातील कार्यकर्ते जमून पिंपरी चिंचवड कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांचे निलंबन मागे घेतल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर प्रभारी व राज्य उपाध्यक्ष हरिभाऊ राठोड यांचे तसेच आपच्या राज्य समितीचे आभार मानले. यावेळी आपल्या मनातील भावना व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी सांगितले की आम आदमी पक्षाच्या ध्येयधोरणांना अनुसरून चेतन बेंद्रे हे अनेक वर्षापासून अहोरात्र काम करत आहेत. यापुढील काळातही कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्या नेतृत्वामध्ये आम आदमी पार्टी शहरांमध्ये सकारात्मक राजकारणाच्या दृष्टीने आपले अस्तित्व निर्माण करेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आपचे ज्योती शिंदे, मीनाताई जावळे, कल्याणी राऊत, सरोज कदम, रोहित सरनोबत, संतोष इंगळे, सुरेश भिसे, राहुल वाघमारे, सुरेंद्र कांबळे, चंद्रमणी जावळे, मोहसीन गडकरी, ब्रह्मानंद जाधव, शुभम यादव, यशवंत कांबळे, गोविंद माळी, वाजिद शेख, स्वप्निल जेवले, राज चाकणे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *