संजय राऊत हे लढवय्ये नेते – सुप्रिया सुळे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०९ नोव्हेंबर २०२२


खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे लढवय्ये नेते असून ते लवकरच बाहेर येतील असे त्या म्हणाल्या.

संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख असे आमचे काही सहकरी आहेत, ज्यांनी काही कारणास्तव अटक करण्यात आली होती. त्यांना आता न्याय मिळतो आहे. यापूर्वी अनिल देशमुखाना जामीन मिळाला, आता संजय राऊतांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे आता त्यांनी लवकर बाहेर येऊन जनतेची सेवा करावी आणि आम्हाला मार्गदर्शन करावे, हीच आमची अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख हे आमचे लढवय्ये नेते आहेत. संघर्ष आहे प्रत्येकाच्या आयुष्याला लागलेला असतो. मात्र, ज्या पद्धतीने तिघांना अटक झाली, हे दुर्देवी होतं. एखाद्यावर जेव्हा अशी वेळ येते, तेव्हा त्यांचे कुटुंबीय मित्र परिवार कोणत्या परिस्थितीतून जातात, हे मी छगन भुजबळ यांच्यावेळी जवळून बघितलं आहे. त्यामुळे आज संजय राऊतांना न्यायालयाने जो न्याय दिला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते असेही त्या म्हणाल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *