बालक मंदिरमध्ये विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
१९ डिसेंबर २०२२

ओझर


श्रीमती एस. आर. केदारी बालक मंदिर मध्ये शुक्रवार दिनांक 16/12/2022 रोजी शाळा व्यवस्थापन समिती आयोजित रोटरी क्लब नारायणगाव आणि भोसले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नारायणगाव, डॉ. हनुमंत भोसले सर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती एस. आर. केदारी बालकमंदिर मधील 815 विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त मा. श्रीमती नंदाताई डांगे मॅडम ,मा. डॉ. श्रीकांत विद्वांस सर,ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. प्रकाश मामा पाटे, ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष मा .सुजित खैरे सर, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न, कृषिभूषण मा.अनिल तात्या मेहेर सर, ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाह मा.रवींद्र पारगावकर सर, ग्रामोन्नती मंडळाचे सहकार्यवाह व बालक मंदिरचे चेअरमन मा. अरविंदभाऊ मेहेर सर,ग्रामोन्नती मंडळाचे संचालक मा. शशिकांत वाजगे सर, बालक मंदिर समितीच्या सदस्या मा.सौ.मोनिकाताई मेहेर मॅडम, ग्रामोन्नती मंडळाचे संचालक मा.रमेश जुन्नरकर सर, ग्रामोन्नती मंडळाचे सदस्य मा.देविदास भुजबळ सर, रोटरी क्लबचे अध्यक्ष व भोसले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे सर्वेसर्वा मा. डॉक्टर हनुमंत भोसले सर , रोटरियन सचिन घोडेकर सर, रोटरियन योगेश भिडे सर,शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. सुनिता पारखे मॅडम, शाळेच्या उपमुख्याध्यापिका मा. सौ. अरुणा कानडे मॅडम उपस्थित होत्या , त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्ग, शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.रत्ना डुंबरे मॅडम, सर्व शिक्षक-शिक्षकेतर स्टाफ , लॅब टेक्निशियन विकास गायकवाड व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

अशा प्रकारे योग्य नियोजन व सर्वांच्या सहकार्याने रक्तगट तपासणी कार्यक्रम यशस्वीरित्या रित्या पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका बिजली दरेकर मॅडम यांनी केले व कार्यक्रम सुंदर व शिस्तमय वातावरणात संपन्न झाला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *