पंतप्रधानांनी स्वतःवरील जाहिरातींवरचा खर्च टाळून गोरगरिबांची पोरं शिकवण्याचं धाडस करावं – सूषमा अंधारे

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
जुन्नर

 

जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधरविण्यासाठी किंवा गोरगरिबांची मुलं चांगल्या शाळेत शिकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच्या जाहिरातींवरचा खर्च कमी करावा व अनाठाही होणारा खर्च गोरगरिबांच्या शिक्षणासाठी वापरावा असा टोला वजा सल्ला शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांनी शिवजन्मभूमी जुन्नर येथे दिला.

शिवसेना महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर, जिल्हा प्रमुख सुरेश भोर, माजी आमदार बाळासाहेब दांगट, अविनाश रहाणे, जिल्हा महिला संघटक श्रद्धा कदम, विजया शिंदे, जयश्री पलांडे, नगरसेविका दिपमाला बढे, मंदाकिनी दांगट, शिवसेना संपर्क प्रमुख दिलिप बामणे, संभाजी तांबे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, जोत्स्ना महाबरे, गुलाब पारखे, अनिल डोके, अशोक खांडेभराड, रामदास धनवटे, प्रसन्ना डोके,शरद चौधरी, सुनिता बोऱ्हाडे, संदीप शिंदे, सरपंच बाबू पाटे, बाबा परदेशी, सुनील मेहर, श्याम पांडे, जयवंत घोडके, सुनील ढवळे, भास्कर गाडगे, मंगेश काकडे, संतोष वाजगे, नगरसेविका किरण जठार आदी मान्यवर उपस्थित होते.

सुषमा अंधारे यांनी भाजप व शिंदे सरकारवर चौफेर टीका करत उपस्थित शिवसैनिकांना आपल्या भाषणाच्या ओघवत्या शैलीत मंत्रमुक्त केले. यावेळी शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, माजी आमदार बाळासाहेब दांगट, माऊली खंडागळे, काळू शेळकंदे आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *