भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना मातृशोक

२५ सप्टेंबर २०२२

भोसरी


भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश किसनराव लांडगे, उद्योजक कार्तिक किसनराव लांडगे आणि टाटा मोटर्स चे कामगार नेते सचिन किसनराव लांडगे यांच्या मातोश्री आणि पै. किसनराव लांडगे यांच्या पत्नी हिराबाई किसनराव लांडगे (वय ६५) यांचे २४ सप्टेंबर रोजी शनिवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

अखिल कुस्तीगीर क्षेत्रात हळहळ वेक्त करण्यात येत आहे . अनेक पहिलवानांना त्यांचा आशीर्वाद शुभेच्छा आणि नेहमी मार्गदर्शन होत असे. त्यातील कित्येक पहिलवानांना त्या मुलगा मानत असे.त्यांच्या मागे पती, तीन मुले , सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांचा अंत्यविधी आज रविवार २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता भोसरी येथील स्मशानभूमीत होणार आहे.

आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *