घोडेगावमध्ये महाविद्यालय परिसरात बेशिस्त वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्यायालयाकडून सात हजार दोनशे रुपये दंडाची शिक्षा

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१० मे २०२२

घोडेगाव


घोडेगाव पोलिस ठाणे हद्दीतील महाविद्यालय परिसरामध्ये घोडेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने व निर्भया पथकाकडून वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जातात. आज रोजी महाविद्यालय परिसरामध्ये दोन विद्यार्थिनी व एक विद्यार्थी आपसात भांडण करताना आढळून आल्यामुळे त्यांच्या विरोधात माननीय न्यायालयात महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये खटला दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने सदर विद्यार्थ्यांना सात हजार दोनशे रुपये दंड ही शिक्षा दिली अशी माहिती घोडेगाव पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.

घोडेगाव पोलीस स्टेशन कडून यापुढेही शाळा महाविद्यालय परिसरामध्ये बेशिस्त वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधात कठोर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे त्यामुळे महाविद्यालय परिसरामध्ये कोणीही गैरकृत्य व बेशिस्त वर्तन करू नये अन्यथा संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येईल असे यावेळी घोडेगाव पोलीसांकडून सांगण्यात आले.