कै. सुमन वाघेरे यांच्या स्मरणार्थ महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयास डेंटल एक्स रे मशीन भेट देणार – मा.नगरसेवक संदीप वाघेरे यांचा उपक्रम

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२९ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी येथील महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयास मा. नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने कै.सौ.सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ डेंटल एकस रे मशीन भेट म्हणून देण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र महापालिकेचे जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.ढगे यांना आज देण्यात आले आहे.

कोरोना काळामध्ये महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटर मार्फत अनेक रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले होते. याच काळामध्ये वाघेरे यांच्या वतीने ५० फाऊलर बेड, ४ हाय फ्लो मशीन व २ व्हेटी लेटर भेट स्वरुपात देण्यात आले होते.महापालिकेच्या  जिजामाता रुग्णालयामध्ये डेंटल युनिट नसल्याने परिसरातील नागरिकांना महापालिकेच्या वाय.सी.एम.रुग्णालयामध्ये जावे लागत होते. अश्या नागरिकांना दंत रोग विषयक उपचारासाठी या मशीनमुळे मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.कै. सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ १ डिसेंबर रोजी महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयास सदर मशीन भेट स्वरुपात देण्यात येणार आहे. अशी माहिती वाघेरे यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *