भाजप – महायुती चे अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप यांनी भरला उमेदवारीचा नामनिर्देशन अर्ज !

अतुल परदेशी मुख्य संपादक 
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या भाजपचे अधिकृत उमेदवार,दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी आज सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या “ग” क्षेत्रीय कार्यालयात आपला अधिकृत उमेदवारी अर्ज भाजपच्या वरिष्ठ व शिंदे गटाच्या नेत्यांच्या उपस्तिथीत दाखल केला आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या कडे अश्विनी जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.अश्विनी जगताप यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून ते “ग “क्षेत्रीय कार्यालय पर्यंत भव्य प्रचार मिरवणूक काढली ज्यात जगताप कुटुंबीयांचे मोठे शक्ती प्रदर्शन पहिला मिळाले. तसेच या प्रचार मिरवणुकीत हजारोच्या संख्येने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते तसेच नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला. ह्या वेळी अश्विनी जगताप यांच्या सह भाजपचे वरिष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,पालकमंत्री चंद्रकांत पाटील,मंत्री तानाजी सावंत,खासदार श्रीरंग आप्पा बारणे,भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे,आमदार उमा खापरे ,लक्ष्मण जगताप यांचे बंधू चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी शंकर जगताप,आजी माजी नगरसेवक तसेच हजारोच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *