शिरूर पोलीसांच्या कारवाईत ४ लाख ८८ हजार ५३४ रु. किमतीच्या देशी व विदेशी दारू जप्त, तर यातील ५ जणांवर गुन्हे दाखल..

बातमी :- रवींद्र खुडे, विभागीय संपादक, शिरूर.
शिरूर :
दि. १८ मे २०२१
शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी, फाकटे, मुंजाळवाडी, कवठे येमाई परिसरात अवैध गावठी दारू बनवणारे दारू भट्ट्यावर व देशी-विदेशी दारू विकणारे यांच्यावर, शिरूर पोलिसांनी कारवाई करत, ४ लाख ८८ हजार ५३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली आहे.

या कारवाईत :-
१) संदीप भानुदास घोडे (रा. टाकळी हाजी ता. शिरुर जि. पुणे),
२) अर्जुन सदाशिव हिल्लाळ,
३) सागर गुडगुल
४) शुभम पांडुरंग मुंजाळ (सर्व रा. कवठे येमाई, ता. शिरुर, जि. पुणे),
५) उमेश चंदु गायकवाड ( रा. फाकटे, ता. शिरूर)
या पाच जणांवर गून्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिलेली माहिती अशी की,
दि. १५ मे २०२१ रोजी, गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की,
टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्राचे हददीमध्ये अवैध्यरित्या देशी व विदेशी दारू, तसेच गावठी हातभटटी दारूची
विक्री चालु आहे. अशी बातमी मिळाल्याने तात्काळ शिरूर पोलीस स्टेशनकडील सपोनि संदीप कांबळे,
पोसई विक्रम जाधव, पोसई स्नेहल चरापले, सहा. फौजदार नजिम पठाण, पोलीस अंमलदार राजेंद्र गोपाळे, पोलीस अंमलदार आण्णासाहेब कोळेकर, पोलीस अंमलदार करणसिंग जारवाल, पोलीस अंमलदार विशाल पालवे, पोलीस अंमलदार सुरेश नागलोत यांना पोलीस स्टेशन येथे बोलावुन घेवुन, बातमीचा आशय समाजावुन सांगुन स्वतः पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे व पोलीस पथक व पंच असे लागलीच सरकारी व खाजगी वाहनाने सदर करावाई करण्यासाठी टाकळी हाजी, फाकटे, मुंजाळवाडी व कवठे येमाई अशा विविध ठिकाणी छापा टाकला. त्यात एकुण ५० लिटर गावठी हातभटटीची तयार दारू, ४३ प्लॅस्टिकचे बॅरल प्रत्येकी २०० लि. मापाचे व त्यामध्ये एकुण ८६०० लि. गावठी हातभटटी तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन, दोन लोखंडी बॅरल व इतर साहीत्य तसेच देशी विदेशी दारूच्या एकुण ११५ बाटल्या, असा एकुण ४ लाख ८८ हजार ५३४ रू. किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
तर गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन पोलीसांनी जागेवरच उद्धवस्त केले.
यात वरील दोषी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदयान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले असुन, सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांचे मार्गदर्शनाखा