दावडी येथील श्री महालक्ष्मी देवीचा भंडारा उत्सव हा शांतीपूर्ण वातावरणात संपन्न…

दिनांक ८/९/२०२१
राजगुरुनगर: प्रतिनिधी अक्षता कान्हुरकर

जगप्रसिद्ध असणाऱ्या दावडी येथील श्री महालक्ष्मी देवीचा भंडारा उत्सव हा कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता शांततेत व नियमांचे काटेकोरपणे पालन करून साजरा करण्यात आला. या भंडाऱ्यानिमित्त अनेक भाविक भक्तांनी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. श्री महालक्ष्मी देवीच्या भंडारा निमित्त ग्रामस्थांनी मंदिराची फुलांच्या माळानी विद्युत रोषणाईने विविध प्रकारे आकर्षक सजावट देखील केली होती. देवीच्या गाभाऱ्यात फळाफुलांनी देवीची खणा नारळाने ओटी भरण्यात आली.

देवीच्या भंडाऱ्यानिमित्त भाविकांना देवीसाठी पूजेसाठी आवश्यक चोळी पातळ, फळ व फुले खरेदि करण्यासाठी केवळ एक ते दोनच स्टॉल लावण्याची व्यवस्था करण्याची परवानगी ग्रामस्थांनी दिली होती. श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात भाविक भक्तांसाठी प्रसादाची सोय देखील करण्यात केली होती. प्रत्येक वर्षी उत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी असते, भाविकभक्तही येथील प्रसादाचा लाभ घेतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला देवीचा प्रसाद म्हणून आमटी भाताचे भोजन दिले जाते. भाविकांनी देखील सोशल डिस्टन्स चा व कम्पल्सरी मास्क चा वापर करून रांगेत प्रसादाचा लाभ घेतला.


या उत्सवाला अनेक पदाधिकाऱ्यांनी येऊन सदिच्छा भेट दिली. खेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव साहेब यांनी एक गाव एक गणपती त्याचप्रमाणे सामजिक उपक्रम राबून गणेशोस्तव साजरा करण्याचं आवाहन उत्सवाच्या निमित्ताने महालक्ष्मी मंदिरात उपस्थित ग्रामस्थांना केले. यावेळी खेड पंचायत समिती सभापती अरूण चौधरी. जिल्हा परिषद सदस्य अतूल देशमुख. चाकण नगरसेवक सुदाम शेवकर. राष्ट्रवादी युवा नेते मयूर मोहिते. शिवसेना नेते विजयसिहशिंदे पाटील.व चेअरमन खरपुडी. बु. वि स सोसायटी. जयशिंगशेठ भोगाडे. उद्योजक पांडुरंग गवळी. उद्योजक विकास नायकिडी. दावडी गावचे सरपंच संभाजीआबा घारे.मा.सरपंच संतोष गव्हाणे. उद्योजक सचिन नवले. उपसरपंच राहुल कदम. भाऊसाहेब होरे मा.जिल्हा परिषद सदस्या वंदनाताई ताई सातपुते.महिला दक्षता समिती सदस्या रुपाली गव्हाणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *